Hingoli Loksabha : भाजपच्या ३ नेत्यांनी भरले अपक्ष उमेदवारी अर्ज, हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली

Hingoli News : महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलेली जागा भाजप नेत्यांच्या बंडखोरीने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam tv

हिंगोली : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली असून बहुतांश ठिकाणी उमेदवार देखील निश्चित झाले आहेत. दरम्यान (Hingoli) हिंगोली लोकसभेमध्ये जागा वाटपामध्ये नाराज झालेल्या (BJP) भाजपच्या तीन नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. (Maharashtra News)

Lok Sabha Election
Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात इसम ठार; सावरला परिक्षेत्रातील घटना

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत भाजप. शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) यांच्याकडून लोकसभा क्षेत्र वाटप करत उमेदवाराचे नाव निश्चित करत आहेत. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) देण्यात आलेली जागा भाजप नेत्यांच्या बंडखोरीने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election
Chalisgaon Crime : चाळीसगाव हादरले; विवाहितेची हत्या करून नदीच्या वाळूत पुरले

आतापर्यंत भाजपमधील तीन मोठ्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजपचे लोकसभा संघटक रामदास पाटील, भाजप अध्यात्मिक आघाडीचे नेते योगी श्याम भारती व भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव जाधव यांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीचे मोठे संघटन लोकसभा मतदार संघात असून या जागेवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो. त्यामुळे ही जागा भाजपला सोडावी; अशी मागणी या बंडखोरी करणाऱ्या नेत्यांनी पक्षाकडे केली होती. मात्र जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेला गेल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com