सागर निकवाडे
नंदुरबार : शहादा तालुक्यातील सावळदा या गावातील राजपाल गिरासे या शेतकऱ्यांनी शहादा येथील उपकार (Nandurbar) एजन्सीकडून ग्रीन गोल्ड-परिपूर्ण कंपनीच्या बियाणं घेऊन गव्हाची लागवड केली होती. मात्र गहू पिकाची वाढच झाली नसल्याने (Farmer) शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या नुकसान झालं आहे. (Live Marathi News)
शहादा (Shahada) तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे (Bogus Seeds) सर्रास विकले जात असते. परंतु कृषी विभागाकडून बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कुठलेही कारवाई होत नाही. त्यामुळे हे बियाणे विकलं जात असते. याला आला अद्याप बसलेला नाही. गव्हाची (Wheat) लागवड करून त्याची वाढ झाली नाही. यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी आणि शहरातील उपकार एजन्सी यावर देखील कडक कारवाई केली गेली पाहिजे; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -
मदतीचे आश्वासन
कृषी विभागाकडून पंचनामे करून शासनाकडे पाठवण्यात आले असून शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे आश्वासन दिलं आहे. एकीकडे कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आलेला आहे. परंतु उपकार एजन्सी आणि ग्रीन गोल्ड- परिपूर्ण या कंपन्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.