Ramtek Politics : मला 4 लाख 70 हजार मते मिळाली होती म्हणून...; वंचितचा पाठिंबा मिळाल्यानंतर किशोर गजभिये काय म्हणाले?

Ramtek Political News : काल रामटेकमधून वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यानंतर वंचितने किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Ramtek Politics
Ramtek Politics Saam tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

kishor Gajbhiye :

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची बोलणी फिस्कटली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने काही उमेदवार जाहीर केले. त्यानुसार रामटेक लोकसभा मतदारसंघातही उमेदवार जाहीर केला होता. तर दुसरीकडे माजी काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनीही अपक्ष उमेदवार अर्ज भरला. मात्र, काल रामटेकमधून वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यानंतर वंचितने किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अपक्ष उमेदवार किशोर गजभिये म्हणाले की, 'मला मागच्या निवडणुकीत चार लाख 70 हजार मते मिळाली. तो एक बेस आहे. अर्थातच ते काँग्रेस पक्षात राहून मला मिळाले होते. काँग्रेस पक्षातील ज्या लोकांना माझा स्वभाव, माझं शिक्षण आवडतं. ते लोक मला मतदान करतील. दुसरीकडे वंचित बहुजनांचा जो व्यापक वर्ग आहे, तो देखील मला मतदान करेल'.

वंचितच्या पाठिंबव्यावर गजभिये पुढे म्हणाले, ' वंचितने मला दिलेल्या पाठिंब्याचा फार मोठा परिणाम निवडणुकीवर होणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक कार्यकर्त्यांचा रामटेकमध्ये फायदा होईल या दृष्टीकोनातून हा पाठिंबा दिला आहे. त्याकरीता त्यांचे आभार. मी काल दौऱ्यावर असल्याने या घटनेची माहिती मला उशिरा मिळाली. त्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या पाठिंबामुळे दूरगामी परिणाम दिसून येणार आहे. माझ्या उमेदवारीत जी कमी होती ती या पाठिंबामुळे दूर झाली'. (Loksabha)

Ramtek Politics
Jyoti Mete News: माझा निर्णय झाला; बीडमधून लोकसभा लढवणार.. ज्योती मेटेंनी स्पष्ट सांगितलं!

'मला आंबेडकरवादी बौद्ध समाजाचे मत मिळतील. मात्र वंचित बहुजन आघाडी ज्या समाज घटकसाठी काम करते, त्या वंचित दुर्लक्षित घटक त्यांच्यासाठी कोणीही काम केले नाही, अशासाठी वंचित काम करत असते. या पाठिंब्यामुळे या सर्व घटकाची मते मला मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Ramtek Politics
Thackeray Shivsainik Clash: संगमनेरमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, लोकसभा उमेदवारासमोरच भिडले शिवसैनिक

तुमच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला फटका बसणार का, या प्रश्नावर गजभिये म्हणाले, ' ती शक्यता आहेच, मात्र केवळ काँग्रेस पक्षालाच फटका बसेल असं काही होणार नाही. एका राजकीय पक्षाच्या पाठिंबामुळे माझी उमेदवारी अधिक भक्कम झाली आहे. खरंतर कधीच कोणत्याही उमेदवाराला एका समाजाचे मत शंभर टक्के पडत नाही. काही मतदार आपल्याला मतदान करणार देखील नाही, ते गृहीत धरूनच आपल्याला काम करावे लागेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com