Onion Harvesting : कांदा काढणीला वेग; भाव वाढीच्या अपेक्षेने चाळीत साठवणूक

Nashik News : मात्र मागील वर्षी कसमादे पट्ट्यात झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचे मोठ नुकसान झाले होते. आता देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळीची धास्ती आहे.
Onion Harvesting
Onion HarvestingSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या कसमा पट्ट्यात सध्या शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरु झाली आहे. (Nashik) मार्केटमध्ये सध्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. यामुळे कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेने (farmer) शेतकरी कांदा मार्केटला न नेता चाळीमध्ये साठवणूक करण्यावर भर देत आहे. (Live Marathi News)

Onion Harvesting
Gorakhpur Express : दुसऱ्या कोचमध्ये चढल्याने चैन पुलिंग; गोरखपुर एक्स्प्रेसचा खोळंबा, आरपीएफची महिलेवर कारवाई

नाशिक, मनमाड परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते. मात्र मागील वर्षी कसमादे पट्ट्यात झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी (Onion) कांद्याचे मोठ नुकसान झाले होते. आता देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळीची धास्ती आहे. यामुळे तीव्र उन्हात सुध्दा मजुरांची जुळवणी करत शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी लगबग सुरु झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Onion Harvesting
Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; डॉक्टराची २० लाखांत फसवणूक

सध्या उन्हाळी कांद्याला सरासरी १५०० रुपये दर मिळत असला तरी आगामी काळात भाव वाढतील ;या आशेवर शेतकरी काढलेला कांदा चाळीत साठवण्यावर भर देत आहे. उन्हाळी कांदा सहा महिने टिकत असल्याने गरजेच्या वेळी टप्प्याटप्प्याने शेतकरी तो बाजारात विक्रीला नेत असतो. त्यामुळे सध्या कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसमादे पट्ट्यात कांदा काढणीला वेग आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com