Nashik News : मालेगावमध्ये माय-लेकी ठरल्या पाणीटंचाईच्या बळी; विहिरीत पडून मृत्यू

Nashik Water Problem : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विहिरीतील पाणी ओढताना पाय घसरून दोघीही विहित पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
Nashik News
Nashik News Saam Digital

Nashik News

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विहिरीतील पाणी ओढताना पाय घसरून दोघीही विहित पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे या भागात पाण्याची टंचाई आहे. यातूनच या मायलेकीचा मृत्यू झाल्याची बोललं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पाणीटंचाईमुळे निताबाई जाधव व त्यांची मुलगी इच्छामणी या दुपारच्या सुमारास गावाजवळील विहिरीत पाणी आणण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाणी विहिरीतून ओढताना पाय घसरून दोघीही विहिरीत पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी शेळ्या-मेंढ्या चारणारे घराकडे येत असतांना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. हा प्रकारत त्यांनी गावातील नागरिकांना सांगितला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माय-लेकींचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी तालुका पोलिस्थानका आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik News
Alibaug Name History: अलिबागला 'अलिबाग' नाव कसं पडलं माहितीये का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com