MHT CET Exam Date: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर

MHT CET Exam Date Announced 9th May to 21st May: उच्च शिक्षण घ्यायचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता एमएचटी सीईची दुसऱ्या संधीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
MHT CET Exam Date
MHT CET Exam DateSaam Tv
Published On
Summary

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सीईटीच्या दुसऱ्या संधीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

९ मे ते २१ मेदरम्यान होणार परीक्षा

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटी परीक्षेच्या दुसऱ्या संधीच्या तारखा जाहीर केल्या आहे. आता ही परीक्षा ९ ते २१ मे यादरम्यान होणार आहे. त्यामुळे सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ही प्रवेश परीक्षा दिल्यानंतरच तुम्हाला उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो.

MHT CET Exam Date
SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (MBA), मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (MMS),अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा जाहीर झाली आहे. ही परीक्षा ९ मे ते २१ मे या कालावधीत होणार आहे. या परीक्षेला एकूण ४ लाख ९२ हजार ३८३ विद्यार्थी बसणार आहेत.

MHT CET Exam Date
SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

पहिल्या संधीच्या सीईटीसठी ८ लाख ६ हजार २३६ विद्यार्थ्यांनी नोंद केली. त्यापैकी ८ लाख ३३ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर आता दुसऱ्या संधीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर दोन परीक्षा घेतल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातदेखील दोन संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एक परीक्षा देणे अनिवार्य आहे. मात्र, दुसरी परीक्षा द्यायची की नाही हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे. दरम्यान, दोन्ही परीक्षा दिल्यावर ज्यात जास्त टक्के मिळणार तो निकाल ग्राह्य धरला जाणार आहे.

MHT CET Exam Date
SSC Exam: मुख्याध्यापक पद खुपत होतं, शाळेतूनच रचला डाव; भूगोलाच्या पेपर चोरीची A to Z स्टोरी आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com