दिल्लीच्या आंदोलनाची धग महाराष्ट्रामध्ये! मुंबईत महात्मा गांधींचे पणतू तर पुण्यातून 102 जण ताब्यात

Gyanesh Kumar Resignation Row: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई आणि पुण्यात आंदोलन करण्यात आले. मुंबईत तुषार गांधी यांना ताब्यात घेतले, तर पुण्यात 102 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
GYANESH KUMAR PROTEST
GYANESH KUMAR PROTESTsaam tv
Published On: 

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा आंदोलनाचा एल्गार दिला होता. मात्र या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली. तरी देखील देशभरातून तरुणाई आणि नागरिक हे दिल्लीत दाखल झाले आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष देखील रस्त्यावर उतरला आहे. हे आंदोलन सुरू होण्याच्या 24 तास आधीच दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून ठेवला होता.

GYANESH KUMAR PROTEST
CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात

संपूर्ण दिल्लीला छावणीचे स्वरूप प्राप्त झालेय. CRPF जवानांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. तर तिकडे पंजाबच्या चंदीगडमध्ये माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना देखील ताब्यात घेण्यात आले. एकीकडे दिल्लीमध्ये रस्त्यावर वाहतूक खोळंबली आहे तर दुसरीकडे ट्रेन, मेट्रो रद्द करूनही आंदोलक कोणत्या ना कोणत्या मार्गाने जंतर-मंतरला पोहोचत आहेत.

GYANESH KUMAR PROTEST
कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, पाहा VIDEO

दिल्लीच्या आंदोलनाची धग महाराष्ट्रामध्ये

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीपाठोपाठ आता मुंबई आणि पुण्यातही आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मैदानापासून जवळपास एक किलोमीटरच्या परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आली असून, अतिरिक्त पोलीस कुमकही तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मैदान परिसराला छावणीचं स्वरूप आलं आहे.

GYANESH KUMAR PROTEST
मोठी राजकीय उलथापालथ होणार अन् ६ महिन्यांत मोदी सरकार पडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

दरम्यान, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मुंबईतील विविध भागांतून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनाही अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आलं. या घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘वोट चोर, गद्दी छोड’ अशा घोषणा देण्यात आल्या. परिस्थिती लक्षात घेता पोलीस ठाण्याबाहेरही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बॉलीवूड अभिनेता इम्रान खान याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस व्हनमध्ये बसवून नेले.

पुण्यातून 102 जण ताब्यात

दुसरीकडे, पुण्यातील लाल महाल चौकात आंदोलन करणाऱ्या 102 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आंदोलकांना पुढील कारवाईसाठी लष्कर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. विद्यार्थी आणि इतर कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू असताना पोलिसांनी ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com