

Sanjay Raut latest new : खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आक्रमक भाषेमध्ये खळबळजनक दावे केले आहेत. आगामी काळात देशामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊन पुढील सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार राऊतांनी केला आहे. दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते. (Sanjay Raut On PM Modi And Amit Shah)
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, "दिल्लीचे 'जम्मू-काश्मीर' करून ठेवले आहे. दिल्लीच्या सगळ्या बॉर्डर अडवून ठेवल्या आहेत, रस्ते सील केले आहेत, विमानं आणि ट्रेन थांबवल्या आहेत. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अतिरेक्यांशी लढण्याची भाषा करतात, मग देशातील तरुण जेव्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करतात, तेव्हा त्यांना अतिरेकी ठरवले जात आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला.
यावेळी बोलताना त्यांनी थेट एप्रिल महिन्यात सरकार कोसळेल आणि देशात पर्यायी सरकार स्थापन होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तसेच, "पोलिसांनी कोणतेही बेकायदेशीर आदेश पाळू नयेत," असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीतील आंदोलनात आपण स्वतः सहभागी होणार असून हिंमत असेल तर अटक करून दाखवा, असे आव्हानही संजय राऊतांनी सरकारला दिले आहे.
फडणवीस आणि शिंदेंवरही टीका
महाराष्ट्रातील सरकारवर बोलताना राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. "देवेंद्र फडणवीस स्वतःला आणीबाणीत सहभागी झाल्याचे सांगतात, पण आज विद्यार्थ्यांवर आंदोलनाचे गुन्हे दाखल होत असताना त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती," असे ते म्हणाले. तसेच, हे सरकार लोकमान्यांचे नसून मेहरबानीने आलेले आहे, ते गेल्यानंतर पक्षातील गटबाजी बाहेर येईल, असेही राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.