Student Allowance Hike: विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट, सरकारकडून निर्वाह भत्त्यात मोठी वाढ; किती रुपये दिले जाणार?

Good News For Student: घरापासून दूर वसतिगृहावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला. सरकारकडून निर्वाह भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली.
Student Allowance Hike: विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट, सरकारकडून निर्वाह भत्त्यात मोठी वाढ; किती रुपये दिले जाणार?
Student Allowance HikeSaam Tv
Published On: 
  • महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात मोठी वाढ

  • वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता महिन्याला १५०० रुपये मिळणार

  • जिल्हास्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना १३०० रुपये मिळणार

वसतिगृहात राहणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट दिलं आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निर्वाह भत्त्यात दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृह योजनेंतर्गत निर्वाह भत्ता वाढीस मंजुरी देण्यात आली. ओबीसी मंत्री अतुल सावेंनी याबाबत माहिती दिली. या निर्णयाचा इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातीं आणि विशेष मागास प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. विभागस्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना महिन्याला १५०० रुपये सरकार देणार आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने १२ मोठे निर्णय घेतले. सरकारने इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Student Allowance Hike: विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट, सरकारकडून निर्वाह भत्त्यात मोठी वाढ; किती रुपये दिले जाणार?
Maharashtra Government: मोठी बातमी! आदिवसी विद्यार्थ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

फडणवीस सरकारने या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निर्वाह भत्त्यात दुपटीहून अधिक वाढ केली. विभागस्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना महिन्याला १५०० रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना १३०० रुपये दिले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता म्हणून दिल्या जाणाऱ्या रक्कमेमुळे त्यांचे घरापासून दूर राहणे सोपे होणार आहे आणि त्यांच्या पालकांची चिंत्ता कमी होईल. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

Student Allowance Hike: विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट, सरकारकडून निर्वाह भत्त्यात मोठी वाढ; किती रुपये दिले जाणार?
Maharashtra Government: 'लाडकी बहीण'नंतर महिलांसाठी आणखी एक योजना, फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोय व्हावी यासाठी ३६ जिल्ह्याच्या ठिकाणी मुलं आणि मुलीसाठी ७२ वसतिगृहे आहेत. सध्या विभागीय स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६०० रुपये दिले जातात. पण आता सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर या विद्यार्थ्यांना दरमहा १५०० रुपये तर जिल्हा स्तरावर १३०० रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे.

Student Allowance Hike: विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट, सरकारकडून निर्वाह भत्त्यात मोठी वाढ; किती रुपये दिले जाणार?
Maharashtra Government Scheme: महाराष्ट्र सरकारची एकल महिलांसाठी नवी योजना, काय आहे यामागचं सत्य?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.