Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ; 1 तोळ्यामागे 2000 रुपयांची वाढ, काय आहे आजचा ताजा भाव ?

Gold Rate Today update : सोन्याच्या दरात आज मंगळवारी वाढ झाली आहे. १ तोळ्यामागे २ हजारांनी वाढलं आहे.
gold rate news
gold rate Saam tv
Published On
Summary

अमेरिका-इराण तणावामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ

24 तासांत सोने 2,000 वाढलं

जळगावमध्ये सोन्याचा दर ₹1,44,200 वर

संजय महाजन, साम टीव्ही

अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावच्या बाजारात सातत्याने सोने-चांदीमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत सोन्याचे दर दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर 5 हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 44 हजार 200रुपये जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 34 हजार 840 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ दिवस युद्ध थांबवण्याची घोषणा केली. यामुळे आखातात काहीशी शांतता निर्माण झाल्याने त्याचा परिणाम भारतीय व्यापाऱ्यावर होताना पाहायला मिळत आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर झाल्याचेही समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा सोन्याचा भाव आज मंगळवारी वधारला. जळगावात सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 44 हजार तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 34 हजार इतका झालाय. सातत्याने सोने-चांदीच्या दरात चढ उतार होताना पाहायला मिळत आहे. यामुळे ग्राहक हे संभ्रम अवस्थेत आहेत.

gold rate news
Gold Rate Today : एकाच दिवसात सोनं १० हजारांनी स्वस्त, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा

बाजार सुरू होताच झाली होती घसरण

बाजारात एक तासापूर्वी सोन्याचा भाव 7 हजार 500 घसरला होता. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 40 हजार 595 रुपये होता. चांदीच्या दरात तब्बल 20 हजारांची घसरण झाली होती. सोन्याच्या दरात अवघ्या 23 दिवसात 34 हजार रूपयांची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात तब्बल 85 हजार रुपयांची घसरण झाली होती.

gold rate news
Gold Rate : गुढीपाडवा धमाका! २४ तासांत सोनं ४ हजारांनी स्वस्त, तर चांदी १३ हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाली होती. अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम सोन्या चांदीच्या दरावर झाल्याचे व्यापारी सांगत होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीमधील गुंतवणूक कच्चा तेलाबरोबर इतर ठिकाणी वळल्याने घसरण होत असल्याचा दावा सराफ व्यावसायिकांची केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com