Political News : शरद पवारांना घट्ट धरुन राहा, आमच्याकडे येण्यासाठी हातपाय जोडू नका : गिरीश महाजनांचा खडसेंना सल्ला (पाहा व्हिडिओ)

नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Girish Mahajan, Eknath Khadse, Dhule
Girish Mahajan, Eknath Khadse, DhuleSaam tv
Published On: 

Dhule News : लोकसभेची निवडणूक लढवून दाखवा मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी खडसे यांना आव्हान करीत तुम्ही दिल्या घरी सुखी राहा असे म्हणत टोला लगावला आहे, त्याचबरोबर खडसे सध्या अजितदादा यांच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहावे मात्र त्यांना माझा सल्ला आहे की ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांनी आनंदात राहावं असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)

Girish Mahajan, Eknath Khadse, Dhule
Wardha News : कॅन्टीन कर्मचा-याचा प्रामाणिकपणा, साेन्याच्या दागिन्यांची पर्स केली परत

मंत्री गिरीश महाजन हे गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांच्या आरतीसाठी धुळ्यात उपस्थित होते. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षप्रमाणे न वागता एखाद्या नेत्याप्रमाणे वागत असल्याच्या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात समाचार घेतला.

Girish Mahajan, Eknath Khadse, Dhule
Tadoba Online Booking : ताडोबा ऑनलाईन बुकिंगचा मार्ग माेकळा, उद्यापासून करा नाेंदणी; जाणून घ्या नवी वेबसाईट

आता तुमच्या निकालाची वेळ आली आहे तर तुम्हाला त्यांचं वागणं वाकड दिसत आहे का, असा प्रश्न देखील महाजन यांनी उपस्थित करत, त्यांनी कसं बोलावं कसं राहावं हे आता अंबादास दानवे ठरवतील का म्हणत अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचा महाजन यांनी समाचार घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार नवे चेहरे भाजपतर्फे दिले जाणार असल्याच्या चर्चांना मंत्री गिरीश महाजन यांनी अशी कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्यात नसून, हे फक्त तुमच्याकडूनच आम्ही ऐकत व बघत असल्याचे म्हणत आमच्यासमोर असा कुठलाही विषय झाला नसल्याचे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये (election) चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Girish Mahajan, Eknath Khadse, Dhule
Lonavala Skywalk Project : लोणावळ्यातील लायन्स, टायगर पॉइंटचे रुपडं पालटणार, जाणून घ्या कसा असेल ग्लास स्कायवाॅक प्रकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.