Lonavala Skywalk Project : लोणावळ्यातील लायन्स, टायगर पॉइंटचे रुपडं पालटणार, जाणून घ्या कसा असेल ग्लास स्कायवाॅक प्रकल्प

यानिमित्ताने दरीवरून चालण्याचा अन झिप लाईनद्वारे हवेतून झेपावण्याचा थरार पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
Lonavala skywalk
Lonavala skywalksaam tv
Published On

Lonavala News : थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेतानाच थरार अनुभवायला मिळणार आहे. दोन हजार फूट दरीवरून चालण्याचा अन हवेतून झेपावण्याचा आनंद ही लवकरच घेता येणार आहे. राज्य सरकारने या पर्यटनस्थळी ग्लास स्काय वाॅक उभारण्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. (Maharashtra News)

Lonavala skywalk
Kolhapur Ganpati Visarjan : बाप्पांच्या विसर्जनासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पंचगंगा नदी परिसरात पाेलीसांचा तगडा बंदाेबस्त

त्यामुळं भविष्यात लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर पॉइंटच रुपडं अक्षरशः पालटून जाणार आहे. दोन हजार फूट खोल दरीवर स्काय वॉक उभारून हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडले जाणार आहेत.

Lonavala skywalk
Ganeshotsav च्या धामधूमीत नवऱ्यास भीती दाखवायला गेली अन् जीव गमावून बसली

यानिमित्ताने दरीवरून चालण्याचा अन झिप लाईनद्वारे हवेतून झेपावण्याचा थरार पर्यटकांना अनुभवता येणार आहे. सोबतच लहानग्यांसाठी विविध खेळ, अँपी थिएटर, फूड पार्क, खुले जिम अन प्रशस्त पार्किंगची सोय केली जाणार आहे.

बारा एकर क्षेत्रावर शंभर कोटी खर्चून राज्य सरकार हे पॉईंट कसे विकसित करणार असल्याची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) आणि लोणावळा वन अधिकारी सागर चुटके यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Lonavala skywalk
Dhule Ganesh Visarjan : बाप्पाच्या विसर्जनासाठी धुळ्यात नऊ ठिकाणी कृत्रिम तळे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com