मराठवाड्यातील भयान वास्तव! महिन्यात ७६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले, सर्वाधिक संख्या बीडमधील

Marathwada farmer suicide statistics : जानेवारी २०२६ मध्ये मराठवाड्यात ७६ शेतकरी आत्महत्या झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर. बीड जिल्ह्यात सर्वाधिक घटना असून कर्ज, दुष्काळ आणि आर्थिक ताण ही प्रमुख कारणे समोर येत आहेत.
Marathwada farmer suicide statistics
Marathwada farmer suicide statisticsSaam
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर प्रतिनिधी

causes of farmer suicides Maharashtra : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या काही थांबायचे नाव घेत नाही. या वर्षाच्या पहिल्याच महिनाभरात म्हणजेच जानेवारी २०२६ मध्ये मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात सर्वाधिक म्हणजे २४ घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. महिनाभरातील शेतकऱ्यांची संख्या समोर आल्यानंतर सर्वसामन्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पावले उचलली असतानाच ही आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या वर्षभरात मराठवाड्यातील तब्बल १ हजार १२९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. मराठवाड्यात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना येथील शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. कधी दुष्काळ, पाणी टंचाई तर कधी अतिवृष्टी यामुळे शेती बेभरवशाची झाली. महागामोलाचे बियाणे लावून आणि देऊनही उत्पन्न मिळत नाही. तर कधी मालाला भाव नाही. परिणामी, बिघडलेले आर्थिक गणिते, अशा या चक्रात अन्नदाता सापडला आहे. या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

Marathwada farmer suicide statistics
Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मराठवाड्यात तब्बल १ हजार १२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर नवीन वर्षात अवघ्या महिनाभरातच ७६ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली असून आत्महत्या सत्र सुरुच आहे. यात सर्वाधिक म्हणजे २४ घटना बीड जिल्ह्यात घडल्या असून त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या जिल्हानिहाय माहिती (१ ते ३१ जानेवारी २०२६)

छत्रपती संभाजीनगर : २०

जालना : ६

परभणी : २

हिंगोली : ५

नांदेड : ११

बीड : २४

लातूर : ३

धाराशिव : ५

एकूण : ७६

Marathwada farmer suicide statistics
ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

संभाजीनगरमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या -

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात खाजगी सावकाराच्या छळाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जरंडी येथील दत्तात्रय रघुनाथ मुठे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दत्तात्रय मुठे यांच्याकडे सुमारे चार एकर शेती होती. शेतीची मशागत आणि पेरणीसाठी त्यांनी बँक तसेच खासगी सावकाराकडून मिळून सुमारे पाच लाखांचे कर्ज घेतले होते. खासगी सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दोन एकर शेती विकून व्याजासह चार पट रक्कम परत दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्यानंतरही उर्वरित दोन एकर जमीन विकून पैसे द्यावेत, असा तगादा संबंधित सावकाराकडून फोनवरून लावला जात असल्याचा उल्लेख त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या सततच्या मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी स्वतःच्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

Marathwada farmer suicide statistics
Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण 'त्या' एका संशयाने सगळा डाव उधळला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com