Beed News: दुष्काळात तेरावा महिना...! बकऱ्या विकून पैसे जमवले; बँकेत जाताच चोरीला गेले

Farmer Money Theft: या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed News
Beed NewsSaam TV
Published On: 

Beed News:

राज्यात पावसाअभावी शेतीपीक जळत असल्याने बळीराजा व्याकुळ झाला आहे. बीडमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीशी दोन हाथ करण्यासाठी एका शेतकऱ्याने आपल्या काही बकऱ्या विकल्या आणि पैसे उभे केले. मात्र चोरट्यांनी त्याची ही रक्कम देखील लंपास केली. (Latest Marathi News)

Beed News
Electricity Theft: महावितरण झाले हायटेक; ड्रोनच्या सहाय्याने पकडली दोन कोटींची वीजचोरी

विकलेल्या शेळ्यांचे 50 हजार रुपये खात्यावर जमा करायला गेलेल्या या शेतकऱ्याचे बँकेत जाताना पैसे चोरीला गेले आहेत. ही घटना बीडच्या वडवणी शहरातील भारतीय स्टेट बँकेत घडलीय. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडवणी शहरातील असलम कुरेशी हे विकलेल्या शेळ्यांचे 50 हजार रुपये घेऊन भारतीय स्टेट बँकेत गेले होते. कॅश विभागात चलन भरत असताना पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना सांगितले. शाखाधिकाऱ्यांनी त्यांना पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. कुरेशी यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, तालुक्याच्या ठिकाणी शहरात राष्ट्रीयीकृत बँकेची एकच शाखा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर दैनंदिन व्यवहार चालतात. मात्र बँक परिसरातूनच पैसे लंपास होत असतील, तर याला जबाबदार धरणार कोणाला धरणार? असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी तात्काळ चोरट्याला शोधावं. अशी मागणी वडवणी करांमधून होत आहे.

Beed News
Nanded Crime News: भाईगिरी करणं पडलं महागात; शर्टचं बटण उघडं ठेवल्याने चार तरुणांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.