Electricity Theft: महावितरण झाले हायटेक; ड्रोनच्या सहाय्याने पकडली दोन कोटींची वीजचोरी

Baramati News : महावितरण झाले हायटेक; ड्रोनच्या सहाय्याने पकडली दोन कोटींची वीजचोरी
Electricity Theft
Electricity TheftSaam tv
Published On

बारामती : मीटरमध्ये छेडछाड करून किंवा थेट मेन लाईनवरून आकडा टाकून वीज चोरी केली जात असते. (Baramati) परंतु विज बिल थकल्याने बंद केलेल्या मीटरलाच बायपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. महावितराने (Mahavitaran) हि चोरी ड्रोनचा वापर करून उघड आणली आहे. (Maharashtra News)

Electricity Theft
Karjat Nagarpanchayat : नगरपंचायतीला पूर्णवेळ अधिकारी काही मिळेना; शेवटी नगराध्यक्ष, नगरसेवक उपोषणाला बसले

महावितरणकडून अधिकृत मीटर घेतल्यानंतर त्या माध्यमातून विजेचा वापर केला. मात्र विजेचा वापर करून त्याचे बिल भरले नाही. यामुळे (MSEDCL) महावितरणने मीटर बंद केले होते. मात्र या बंद केलेल्या मीटरलाच बायपास करून उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी केली. या वीज चोरी करणाऱ्या मुकेश अगरवाल यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Electricity Theft
Pimpri Chinchwad Crime: जावयाची करामत..सासूकडून खंडणी उकळण्यासाठी धक्कादायक कृत्य

तीन ग्राहकांकडून चोरी 
उघड झालेल्या वीजचोरीत प्रकाश करुगेटेड पुणे प्रा.लि या ग्राहकाला ४ लाख ७३ हजार २९० युनिट वीजचोरी पोटी १ कोटी ११ लाख रुपये, मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. या ग्राहकाला २ लाख ५ हजार सहा युनिट चोरीचे ५१ लाख ३४ हजार तर भगवान ट्यूब प्रा.लि या ग्राहकाला २ लाख ३४ हजार ९६१ युनीट चोरीसाठी ४२ लाख २५ हजार रुपये असे तीन ग्राहकांचे मिळून २ कोटी चार लाख रुपये दंडाचे बील कंपनीचे मालक मुकेश ओमप्रकाश अगरवाल यांना देण्यात आले आहे. तसेच कार्यकारी अभियंता दरवडे यांच्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा व वीज यंत्रणेस छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com