Pimpri Chinchwad Crime: जावयाची करामत..सासूकडून खंडणी उकळण्यासाठी धक्कादायक कृत्य

Pimpri Chinchwad : जावयाची करामत..सासूकडून खंडणी उकळण्यासाठी धक्कादायक कृत्य
Pimpri Chinchwad Crime
Pimpri Chinchwad CrimeSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : श्रीमंत सासू असल्याने तिच्याकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये समोर आला आहे. याकरिता जावयाने कटकारस्थान रचले; परंतु (Crime News) एवघ्या काही तासातच जावयाचा कारनामा समोर आला आहे. या प्रकाराने सारेच थक्क झाले आहेत. (Tajya Batmya)

Pimpri Chinchwad Crime
Jalgaon Rain: जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकार समोर आला आहे. आपल्या श्रीमंत सासुकडून दहा लाखांची खंडणी उकळण्यासाठी चक्क स्वतःच्या मुलीसह मेहुनीच्या मुलीचे अपहरण केलं आहे. सचिन मोहिते ह्या जावयाने तीन महिन्यांपूर्वी अपहरणाचा कट रचला होता. अपहरण करण्यासाठी सचिन मोहितेने आपल्या मेहुणीचा मोबाईलही चोरला होता. त्यांच मोबाईलचा वापर करत त्याने अपहरणाच्या गुन्ह्यांत खंडणी मागण्यासाठी देखील केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

Pimpri Chinchwad Crime
Karjat Nagarpanchayat : नगरपंचायतीला पूर्णवेळ अधिकारी काही मिळेना; शेवटी नगराध्यक्ष, नगरसेवक उपोषणाला बसले

रक्षाबंधनाच्या दिवशीच अपहरण 

अपहरण करता जावई सचिन मोहिते यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतः च्या आणि मेहुनीच्या मुलीचे अपहरण करून त्यांना आपल्या वाघोली येथिल घरी डांबून ठेवले. रक्षाबंधाच्या दिवशी राखी आणण्यासाठी गेलेल्या मुली घरी परत न आल्याने आरोपीसह मुलींच्या आईने वाकड पोलिसात तक्रार दिली होती. नातींच अपहरण केल्याने सासू पैसे देईल; या उद्देशाने हे अपहरण करण्यात आलं होतं. परंतु, काही तासातच या अपहरणाचा कट उघड करत आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com