Nanded Crime News: भाईगिरी करणं पडलं महागात; शर्टचं बटण उघडं ठेवल्याने चार तरुणांवर गुन्हा दाखल

Nanded Police: शायनींग मारत भाईगिरी करणे तार तरुणांना महागात पडलं आहे. पोलिसांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवलीये.
Nanded Crime News
Nanded Crime NewsSaam TV

Nanded News:

काही तरुण आपण सगळ्यात हटके आणि रुबाबदार दिसावं म्हणून वेगवेगळी फॅशन करतात. त्यात भाईगीरी करणारे तरुण हमखास आपल्या शर्टची काही बटणे खुली ठेवतात. आता अशीच शायनींग मारत भाईगिरी करणे चार तरुणांना महागात पडलं आहे. पोलिसांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवलीये. (Latest Marathi News)

Nanded Crime News
Nanded Crime News: झोपेतच केली पत्नीची हत्या; हत्येनंतर पतीने घेतला गळफास

चार तरुण आपल्या शर्टची काही बटणे उघडी ठेवून पोलीस ठाण्यात आले होते. या चौघांना पोलीस निरीक्षकाने चांगलीच अद्दल घडवली. बटण उघडे ठेवणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस स्टेशनची हवा दाखवली आहे.

लोहा पोलीस स्टेशनमध्ये अशा पध्दतीने जाणं चौघांना चांगलंच अंगलट आलंय. वेगवेगळ्या कारणांसाठी चौघेजण नांदेडच्या लोहा पोलीस ठाण्यात आले होते. पण पोलीस ठाण्यात आले त्यावेळी या चौघांच्या शर्टचे वरचे बटण उघडे होते. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी ते पाहिले आणि चौघांना चांगली अद्दल घडवली.

या चौघांविरुदध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कलम 110, 112 आणि 117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाणे हे शिस्तीचे आणि सार्वजनिक ठिकाण आहे. या ठिकाणी असभ्य वागणे योग्य नसल्याने गुन्हा दाखल केल्याची प्रतिक्रीया पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.

पोलीस ठाण्यात शर्टचे बटण उघडे ठेवल्याने तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नांदेडमधील या घटनेची संपूर्ण गावभर चर्चा सुरू आहे. फक्त शर्टच्या बटणावरून गुन्हा दाखल झाल्याने गावातील इतर भाईगीरी करणारे तरुण देखील नमले आहेत.

Nanded Crime News
Crime News : तिहेरी हत्याकांडाने नगर जिल्हा हादरला, पत्नी, मेहुण्यासह आजे सासूचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com