Crime News : तिहेरी हत्याकांडाने नगर जिल्हा हादरला, पत्नी, मेहुण्यासह आजे सासूचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

संशयितास पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा शिर्डी पाेलीस कसून तपास करीत आहेत.
Shirdi, Shirdi Crime News
Shirdi, Shirdi Crime Newssaam tv
Published On

- सचिन बनसाेडे

Shirdi News : शिर्डी नजीक एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील संशयितास पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. शिर्डी पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

Shirdi, Shirdi Crime News
Ganpati Onboard Godavari Express : गोदावरी एक्सप्रेसमध्ये बाप्पा विराजमान, सर्वधर्मीय भाविकांची दर्शनास झुंबड

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शिर्डी जवळील सावळीविहीर गावात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार जावयाने पत्नीची, मेव्हण्याची आणि आजे सासूची धारदार शस्राने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.

Shirdi, Shirdi Crime News
Ganeshotsav 2023 : गणेशाेत्सव काळात गाैतमी पाटीलच्या ठुमक्यांवर बंदी, पाेलीसांचा निर्णय

या घटनेत वर्षा सुरेश निकम (varsha suresh nikam shirdi) (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

संशयितास पाेलीसांनी घेतले ताब्यात

संशयित सुरेश निकम (suresh nikam shirdi case) याला नाशिक जिल्ह्यातून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पाेलीसांनी व्यक्त केला आहे. संशयिताविराेधात शिर्डी पोलीस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Shirdi, Shirdi Crime News
Chandrayaan- 3 चा देखावा साकारत संत राेहिदास मंडळाचा शास्त्रज्ञांना सलाम, कार्ल्यात भाविकांची तुफान गर्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com