Chandrayaan- 3 चा देखावा साकारत संत राेहिदास मंडळाचा शास्त्रज्ञांना सलाम, कार्ल्यात भाविकांची तुफान गर्दी

Ganesh Festival 2023 : हा देखावा बघण्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करु लागले आहेत.
sant rohidas tarun mandal karla, ganesh festival 2023
sant rohidas tarun mandal karla, ganesh festival 2023saam tv
Published On

Maval Ganpati Utsav : भारताने चांद्रयान ३ ची मोहिम नुकतीच फत्ते केली. चांद्रयान ३ माेहिमेमुळे एक इतिहास रचला गेला. इस्त्रोचं स्वप्न साकार झाले. भारतीय शास्त्रज्ञ यांची प्रेरणा घेत मावळ येथील कार्ला एकविरा देवीच्या गावात संत रोहिदास महाराज तरुण मंडळाने चांद्रयान 3 (sant rohidas maharaj tarun mandal Chandrayaan- 3 Decoration) हा हलता देखावा साकारला आहे. हा देखावा बघण्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करु लागले आहेत. (Maharashtra News)

sant rohidas tarun mandal karla, ganesh festival 2023
Gokul Dairy AGM : 'गोकुळ' च्या सभेत शौमिका महाडिकांचा आवाज दाबला, गुंड आणल्याचा सतेज पाटलांचा पलटवार (पाहा व्हिडिओ)

गणपती तर सर्वच मंडळे बसवतात मात्र या यातून देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी चंद्रयान तीन हा हलता देखावा करण्यात आला आहे अशी माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. या देखाव्यासाठी साधारण मंडपाची उंची सात फूट तर रुंदी तीन फूट इतकी ठेवण्यात आली आहे. हा हलता देखावा तयार करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागला.

sant rohidas tarun mandal karla, ganesh festival 2023
Success Story : मुलीने एसटी चालवताच आईच्या चेह-यावर हसू अन् डाेळ्यात आनंदाश्रू; 'भावाचं वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही माझी पल्लवी डगमगली नाही'

टाकाऊ वस्तू पासून चांद्रयन 3 चा देखावा साकारण्यात आला आहे. यासाठी केवळ 5 हजार रुपये इतकाच खर्च लागला. या मंडळाची चांद्रयन गणपती डेकोरेशन मोहिम फत्ते करण्यासाठी मंडळातील प्रत्येक महिला, पुरुष, अबालवृद्धांनी सहभाग नाेंदवित हातभार लावला.

या मंडळाचे 78 वे वर्ष आहे. देखावा करण्यामागचा उद्देश: भारत देशाचे वैज्ञानिक यांनी चंद्रयान 3 चे संशोधन केले. त्या संशोधनावर सर्व भारतीयांचा आत्मविश्वास वाढावा. तसेच देशाविषयी निष्ठा व प्रेम वाढवे या दृष्टीने प्रयत्न केला गेला असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले.

sant rohidas tarun mandal karla, ganesh festival 2023
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

देशातील प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी या ISRO च्या शास्त्रज्ञ यांनी करून संपूर्ण जगावर भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या देशासाठी असं योगदान देणं गरजेचं असल्याने एकविरा देवीच्या कार्ला गावात गणेशाेत्सव साजरा करताना गणपतीच्या देखाव्यात ही चांद्रयन 3 ची मोहिम फत्ते करताना आम्हांला ही भारताचा सार्थ अभिमान असल्याचे संत रोहिदास मंडळातील अनिल पटेकर, रश्मी जाधव, नितीका जाधव, कार्तिक जाधव यांनी कलाकार शास्त्रज्ञांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com