Success Story : मुलीने एसटी चालवताच आईच्या चेह-यावर हसू अन् डाेळ्यात आनंदाश्रू; 'भावाचं वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही माझी पल्लवी डगमगली नाही'

आपली मुलगी जिल्ह्यातील पहिली बस चालक झाल्याचा सार्थ अभिमान तिच्या आईच्या चेहऱ्यावर दिसून आला.
Pallavi Beldar, Nandurbar News, success story of pallavi beldar msrtc bus driver
Pallavi Beldar, Nandurbar News, success story of pallavi beldar msrtc bus driversaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News : घरातील कर्त्या माणसाचा आधार गेल्यानंतर दुःख करत न बसता परिस्थितीशी दोन हात करत नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील शहादा येथील पल्लवी बेलदार या तरुणीने नंदुरबार जिल्ह्यात पहिली महिला बस चालक (Pallavi Beldar MSRTC Bus Driver) होण्याचा मान मिळवला आहे. पल्लवीच्या हा प्रवास संघर्षमय राहिला असून तिने जिल्ह्यातील शहादा आगारातील बस फेऱ्या मारून आपल्या कामाचा नुकताच श्रीगणेशा केला. (Maharashtra News)

Pallavi Beldar, Nandurbar News, success story of pallavi beldar msrtc bus driver
Udayanraje Bhosale : ...तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल; उदयनराजेंच्या पाेस्टची जनमाणसांत चर्चा

पल्लवीची वडिलांचा काेराेनाच्या काळात मृत्यू झाला. त्यामुळे बेलदार कुटुबियांचा आधार गेला. त्यापुर्वी सन 2017 मध्ये तिच्या भावाचा मृत्यू झाला. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याने घराची जबाबदारी पल्लवीवर आली. सन 2019 मध्ये ती चालकाचे प्रशिक्षण घेत असताना वडील कोरोनात गेले.

आता काय करावे हा मोठा प्रश्न तिच्या समोर होता. आईचा सांभाळ घराची जबाबदारी आणि एसटी महामंडळ मधील चालकाची ट्रेनिंग या सर्व गोष्टींचा मिलाफ करत परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्धार तिने केला.

Pallavi Beldar, Nandurbar News, success story of pallavi beldar msrtc bus driver
Ashadhi Ekadashi : पंढरीसाठी नांदेड विभागाच्या सहा विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळापत्रक

संघर्षमय परिस्थितीत न डगमगता तिने छत्रपती संभाजी नगर येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शहादा आगारात बस चालक म्हणून ती जिल्ह्यातील पहिली महिला एसटी चालक म्हणून रुजू झाली.

आज कालच्या तरुणी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांनी मनात कोणताही प्रकारचा दडपण न ठेवता संघर्ष केल्यास यश नक्की प्राप्त होते हे पल्लवीने तिच्या कर्तुत्वाने सिद्ध केले. मनाशी जिद्द बाळगत तिने हे स्वप्न पुर्ण केल्याने तिच्या आई देखील खूप खूष झाली आहे.

Pallavi Beldar, Nandurbar News, success story of pallavi beldar msrtc bus driver
Yavatmal News : कुटुंबियांनी 5 दिवसाच्या बाळास दिले बिब्याचे चटके, डाॅक्टरांचे बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

आपली मुलगी जिल्ह्यातील पहिली बस चालक झाल्याचा सार्थ अभिमान तिच्या आईच्या चेहऱ्यावर दिसून आला. अभिमानासोबतच तिच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंदाश्रू पल्लवीच्या यशाची ग्वाही देतात वडील गेल्यानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बहीण आणि पाहुण्यांनी केलेल्या मदतीवर परिवाराचा सांभाळ करत मिळवलेले यश माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया पल्लवीच्याने आईने साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Pallavi Beldar, Nandurbar News, success story of pallavi beldar msrtc bus driver
New Babies Born : तिळ्यांच्या जन्माने जाधव कुटुंबियांत हर्षाेल्लास; आईसह तान्हुले ठणठणीत

केल्याने होते रे केलेच पाहिजे या उक्ती प्रमाणे आलेल्या संकटात न डगमगता पल्लवीने संघर्ष करत आपलं प्रशिक्षण पूर्ण करून जिल्ह्यातील पहिली महिला बस चालक होण्याचा सन्मान मिळवला. ही तिच्यासाठी जशी अभिमानाची गोष्ट आहे तशीच आजच्या नवीन पिढीसाठी आणि तरुणींसाठी प्रेरणादायी कहाणी ठरेल हे मात्र निश्चित.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com