Voter List Fraud: व्होट चोरीचा आणखी एक पुरावा; बदलापूरमध्ये १७ हजार बाहेरील मतदार

Badlapur Voter List Fraud 2025: बदलापूरच्या पालिका निवडणुकीसाठी मतदार यादीत शहराबाहेरील तब्बल १७ हजार मतदारांची नावे समाविष्ट केली गेली.
Municipal Election Shiv Sena Chief Vaman Mhatre Highlights Alleged Voter List Fraud
Municipal Election Shiv Sena Chief Vaman Mhatre Highlights Alleged Voter List FraudSaam Tv
Published On

बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील 17 हजार मतदारांची नावं असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे. बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. तर बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल 17 हजार मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत टाकण्यात आली आहेत.

Municipal Election Shiv Sena Chief Vaman Mhatre Highlights Alleged Voter List Fraud
Maharashtra Politics: राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसेच्या कार्यक्रमाला शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी, सूचक विधान करत म्हणाले...VIDEO

खोटे डॉक्युमेंट देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीत टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आलीय. या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केलीय.

Municipal Election Shiv Sena Chief Vaman Mhatre Highlights Alleged Voter List Fraud
Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडओ'; म्हणत दाखवला नरेंद्र मोदींचे ते भाषण|VIDEO

सध्या देशभरात व्होट चोरीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील अनेक मोठमोठे पुरावे दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी देखील राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे पुरावे दिले आहे.दिवसागणिक मतदार यादीमधील झालेला फेरबदल आणि विधानसभा निवडणुकीत झालेले घोळ याचे अनेक पुरावे आता विरोधी पक्षाचे नेते समोर आणत असताना आता बदलापूरमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे.

Municipal Election Shiv Sena Chief Vaman Mhatre Highlights Alleged Voter List Fraud
Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

यामध्ये मलंगगड, बारवी परिसर, मुरबाड, शेलु, नेरळ, वांगणी, भिवंडी, शहापूर, कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिलीय. तसंच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले, तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे. मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल, असंही वामन म्हात्रे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com