Election Roll Controversy in Maharashtra: बुलढाण्यात 1 लाख बोगस मतदार?मतदारयाद्यांमध्ये घोळ, आयोग करतंय काय?

Sanjay Gaikwad Raises Alarm Over Bogus: राज्यात बोगस मतदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय..अशातच थेट सत्ताधारी पक्षातील नेत्यानंचं बोगस मतदारांवरून निवडणुक आयोगाला धारेवर धरलंय... हा सत्ताधारी आमदार कोण आहे? त्यानं काय आरोप केलाय?
Shinde Sena MLA Sanjay Gaikwad addresses the media on the alleged 1 lakh bogus voters in Buldhana.
Shinde Sena MLA Sanjay Gaikwad addresses the media on the alleged 1 lakh bogus voters in Buldhana.Saam Tv
Published On

राज्यात बोगस मतदारप्रकरणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला घेरलं असतानातच आत्ता सत्ताधारी पक्षातील आमदारानंही सरकारला घरचा आहेर दिलाय. बघा काय म्हणालेत.. शिंदेसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड..

बुलढाणा शहरात चार हजार तर जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक बोगस मतदार असून त्यांच्यावर अजूनही कारवाई का नाही? असा सवालच त्यांनी विचारलाय. संजय गायकवाड यांनी निवडणुक आयोगाच्या कारभारावर काय आरोप केलेत

निवडणुक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ केली जात असून मृत व्यक्तींची आणि नियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची नावं वर्षांनुवर्ष यादीतून काढण्यात आलेली नाहीत. तसंच मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्याची गरजही त्यानी व्यक्त केली.

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मतदारयाद्यामधील घोळ समोर आला.... त्यानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत..याद्यामधील घोळ निकाली लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली... तर दुसरीकडे सत्ताधारीही मतदारयाद्यांमधील घोळ दूर करण्याविषयी आयोगावर प्रश्न उपस्थित करतायत.

गेल्या महिन्याभरापासून व्होटचोरी आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत... त्यातच आता सत्ताधारी आमदारानं आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यानं मतदारयाद्यांमधील घोळ आयोग कधी आणि कसा दूर करणार? आणि खरोखरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करणार का हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com