Maharashtra Politics: राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसेच्या कार्यक्रमाला शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी, सूचक विधान करत म्हणाले...VIDEO

ShivSena Shinde And BJP Leaders At MNS Program: अंबरनाथच्या हेरंब मंदिर परिसरात मनसेच्या दीपसंध्या कार्यक्रमाला शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सूचक विधान केले आहे.

अजय दुधाने, साम टीव्ही

अंबरनाथच्या हेरंब मंदिर परिसरात मनसेच्या वतीने दीपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने हजेरी लावली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सूचक वक्तव्य केलं की आपली युती सुद्धा होऊ शकते सगळे खेळ रात्री चालतात असं विधान केलं आहे. सुनील चौधरी यांनी आपल्या भाषणातून धनंजय गुरव यांच कौतुक करत म्हणाले की,

मी आज स्टेजवर जरी शिवसेनेचा असलो आणि तुम्ही मनसेचा बोर्ड लावला आहे. कधी काय होऊ शकते. आपली युती सुद्धा होऊ शकते. सगळे खेळ रात्री चालतात. रात्री काय होत. सकाळी काय होत. हे कोणालाच कळतं नाही. आम्ही एकमेकांच्या विरोधात बोलतो आणि सकाळी गळ्यात गळे घालून एकत्र जातो. हे राजकारण आहे. त्या त्या गोष्टीवर आणि काही बोलण्याच्या बाबतीत एकत्र यावं लागतं. या सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे. राज साहेब ठाकरे यांनी अभिजात मराठीचा दर्जा दिला असल्याचं चौधरी यांनी म्हटलं आहे. एकीकडे उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अंबरनाथमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार का? असा प्रश्न अंबरनाथकरांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com