उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पंढरपूरात धावपळ |VIDEO

Eknath Shinde Helicopter Technical Glitch: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. कार्तिक यात्रेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर परतीच्या प्रवासापूर्वी हा प्रकार घडला.
Eknath Shinde helicopter develops technical fault
Eknath Shinde helicopter develops technical faultsaam tv
Published On: 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. कार्तिक यात्रेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ते परतीच्या प्रवासासाठी रवाना होणार होते. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. तसेच यावेळी प्रशासनाची काहीवेळ तारांबळ देखील उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.