Maharashtra : महाराष्ट्रातील मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Metro Station Name Change : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन.
Maharashtra Government Change Metro Station Names
Maharashtra Government Change Metro Station Names AI Image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रातील मेट्रो स्थानकांच्या नावांचा नव्याने विचार करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

  • मुंबई, पुणे आणि नागपूर महानगर क्षेत्रातील मेट्रो स्थानकांचा प्रक्रियेत समावेश.

  • नगरविकास विभागाचे उपमुख्यमंत्री समितीचे सह-अध्यक्ष असतील.

प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर महानगर क्षेत्रातील मेट्रो स्थानकांच्या नावांचा या प्रक्रियेत विचार केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात काही मेट्रो स्थानकांची नावे बदललेली पाहायला मिळू शकतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. नगरविकास विभागाचे उपमुख्यमंत्री या समितीचे सह-अध्यक्ष असतील. याशिवाय संबंधित भागातील खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्प राबवणाऱ्या संस्थांचे प्रशासकीय प्रमुख समितीचे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतील.

Maharashtra Government Change Metro Station Names
Breaking News : मोठी बातमी! भाजपकडून शिंदेसेनेला मोठा झटका, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'

मेट्रो स्थानकांना नाव देताना केवळ बदल करण्यावर भर न देता त्या परिसराची ओळख आणि इतिहास लक्षात घेतला जाणार आहे. संबंधित भागाचा सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक महत्त्व आणि भौगोलिक वैशिष्ट्ये यांचा विचार केला जाईल. तसेच स्थानिक नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या मतांनाही महत्त्व दिले जाणार आहे. स्थानकांची नावे सर्वसामान्यांना सहज समजणारी आणि उच्चारायला सोपी असावीत, याचीही काळजी घेतली जाणार आहे. एकाच नावामुळे वेगवेगळ्या ठिकाणांबाबत प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, हेदेखील पाहिले जाईल. नामकरण करताना राजकीय किंवा धार्मिक वाद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निकषही ठरवण्यात आले आहेत.

Maharashtra Government Change Metro Station Names
Breaking News : मोठी बातमी! भरदिवसा काँग्रेस नेत्याच्या कारवर 7 गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

या संपूर्ण प्रक्रियेत मेट्रो व्यवस्थापन संस्था सर्वप्रथम संबंधित स्थानकांच्या नावांबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार आहे. त्यानंतर नगरविकास विभाग हा प्रस्ताव समितीसमोर मांडेल. समिती त्याचा अभ्यास करून योग्य नावांबाबत केंद्र सरकारला शिफारस करणार आहे. पुढील कार्यवाहीसाठी अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. मात्र, सध्या कोणत्या मेट्रो स्थानकांची नावे बदलणार, याबाबत कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. समितीच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.