Dadar Metro station to be renamed Chaityabhoomi : दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण केले जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक त्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विधिमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक पूर्तता अधिवेशनात पूर्ण करून या नामकरणाची कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक सोयीसुविधा, सुरक्षा आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.