

दिवेआगर समुद्रकिनारी ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
आळंदीच्या विद्यार्थ्यांच्या दिवेआगर सहलीत मोठी दुर्घटना
दिवेआगर दुर्घटनेतून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितला थरारक अनुभव
पाण्यात उतरल्यानंतर दिवेआगर येथे विद्यार्थ्यांसोबत भयंकर घडलं
पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला
रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पिकनिकसाठी गेलेल्या पुण्यातल्या आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि शिक्षक दिवेआगर येथे फिरण्यासाठी गेले होते. पण पोहण्यासाठी समुद्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ८ विद्यार्थी बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज आळंदी बंदची हाक देण्यात आली आहे. या दुर्घटनेतून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय घडलं होतं याची माहिती साम टीव्हीशी बोलताना दिली. तसंच त्यांनी भविष्यात सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरण्यापूर्वी काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
दिवेआगरला सहलीला जाताना मनात आनंद आणि मजा करण्याचा उत्साह होता. मात्र समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या दुर्घटनेनं सगळंच बदलून गेलं, अशी भावना बचावलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं याचा थरारक अनुभव सांगितला. सहलीला गेल्यानंतर पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांना होतो मात्र पाण्याचा अंदाज न आल्यास जीवावर बेतू शकतं, याची जाणीव या दुर्घटनेनं करून दिली आहे. त्यामुळे भविष्यात सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी समुद्र किंवा नदीच्या पाण्यात उतरताना विशेष काळजी घ्यावी, शक्यतो पाण्यात उतरू नये, असं आवाहन या बचावलेल्या विद्यार्थ्यांनी केलंय. आनंदाची सहल क्षणात दुःखद ठरू शकते, हा धडा या दुर्घटनेनं दिला आहे.
दिवेआगर दुर्घटनेत ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आज आळंदी बंद ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, सहलीवरून परतलेल्या बचावलेल्या विद्यार्थ्यांना चौकशीनंतर पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवेआगर येथील दुर्घटनेनंत0र आळंदीमध्ये शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर आज आळंदी बंद ठेवण्यात आली आहे. सहलीवर गेलेले उर्वरित विद्यार्थी सकाळी आळंदीमध्ये परतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक-एक करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आपल्या मुलांना सुरक्षित पाहण्यासाठी पालक सकाळपासूनच आळंदीत दाखल झाले होते. विद्यार्थी ताब्यात मिळताच पालक त्यांना घेऊन घरी रवाना होत आहेत.
दरम्यान, दुर्घटनेनंतर दिवेआगार समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा यंत्रणा चर्चेत आली आहे. या साडेचार किलो मीटर लांब समुद्र किनाऱ्यावर केवळ एकच जिव रक्षण नियुक्त आहे त्याला जिल्हा प्रशासनाकडून पगार किंवा मानधन देखील दिले जात नसल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. गुरूवारी संध्याकाळी ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बचाव कार्य याबाबत प्रत्यक्षदर्शी पर्यटक आणि सुरक्षा यंत्रणांतील त्रूटींबाबत स्थानिक नागरीकांनी संताप व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.