Beach Accident : रायगडमध्ये मोठी दुर्घटना! दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू

Diveagar Beach Accident : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेले ८ पर्यटक समुद्राच्या खोल पाण्यात बुडाले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
Drown
Drownsaam tv
Published On: 

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी एक मोठी आणि सुन्न करणारी दुर्घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेले आठ जण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथून एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे फिरण्यासाठी आली होती. किनाऱ्यावर आनंद लुटत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ८ जण समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले.

Drown
Shiv Bhojan : शिवभोजन योजनेबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नवीन GR जारी, आताच जाणून घ्या नियम

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बुडलेल्या आठही जणांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण उपचाराधीच त्यांचा मृत्यू झाला.

दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांची नावे

1. राजवीर वाहिले

2. सोहम भांडवळकर

3. कौस्तुभ दोंड

4. यश वानखेडे

5. कैवल्य वासंकर

6. तन्मय वाहिले

7. सुमित अहिरे

8. प्रणव बनसोडे

Drown
Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून पर्यटकांना समुद्रात उतरताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com