Shiv Bhojan : शिवभोजन योजनेबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नवीन GR जारी, आताच जाणून घ्या नियम

Shiv Bhojan Thali yojana : शिवभोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. प्रत्येक केंद्रात सीसीटीव्ही बंधनकारक असून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत थाळी दिली जाणार आहे.
shivbhojan thali
shivbhojan thali saam tv
Published On: 

Shiv Bhojan scheme new rules in Maharashtra : शिवभोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केली असून सर्व जुने शासन निर्णय एकत्रित केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही (CCTV) अनिवार्य असणार आहे. ही केंद्रे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान सुरू राहतील आणि दररोज १० रुपयांत किमान ७५ ते कमाल २०० थाळ्या दिल्या जातील. पार्सल नेण्यास आणि बाहेरचे अन्न आणण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांना दररोज ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

राज्यातील गरीब, मजूर, गरजू व स्थलांतरित व्यक्तींना अत्यंत सवलतीच्या दरात गुणवत्तेचे भोजन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ०१ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये “शिवभोजन योजना” सुरू केली. सदर योजनेची सुरूवात २६ जानेवारी, २०२० पासून करण्यात आली. यानंतरच्या काळात शिवभोजन योजनेशी संबंधित सर्व तरतुदी, अटी-शर्ती, निविदा प्रक्रिया, आर्थिक व प्रशासकीय कार्यपद्धती, गुणवत्ता व शिस्तपालन नियमावली आणि देयक अदायगी प्रक्रिया (SOP) इत्यादी बाबत आवश्यकतेनुसार शासन निर्णय / परि पत्रके निर्गमित करण्यात आली आहेत.

shivbhojan thali
Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

थाळीचा दर व लाभार्थी शुल्क :

प्रत्येक शिवभोजन थाळीची किंमत/ मूल्य शहरी भागासाठी ₹५०/- व ग्रामीण भागासाठी ₹३५/- निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक लाभार्थ्याकडून प्रति थाळी ₹१०/- एवढी रक्कम आकारण्यात येईल, उर्वरित रक्कम (शहरी भागात ₹४०/- आणि ग्रामीण भागात ₹२५/- प्रति थाळी) शासन अनुदानाच्या स्वरूपात संबंधित शिवभोजन केंद्र चालकास अदा करेल.

shivbhojan thali
सणासुदीच्या तोंडावर साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, साठेबाजांचे दाबे दणाणले; काढला नवा आदेश

भोजनालयाचे ठिकाण, वेळ व संचालन नियम/ अटी व शर्ती :

शिवभोजन केंद्रे ही प्रामुख्याने गरीब, मजूर व कामगारांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणीच (उदा. जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये परिसर इ.) सुरू करण्यात यावीत.

शिवभोजन केंद्र सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० या वेळेतच सुरू राहतील. सदर कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शिवभोजन केंद्र चालकाची असेल.

शिवभोजन केंद्रात एका वेळी किमान २५ व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असावी.

एका शिवभोजन केंद्राची प्रतिदिन थाळी संख्या किमान ७५ आणि कमाल २०० थाळी अशी राहील.

पार्सल व बाहेरचे अन्न : शिवभोजन केंद्रात बाहेरचे जेवण आणण्यास किंवा केंद्रातील जेवण बाहेर नेण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत पार्सल (Take-away) सुविधा पुरवता येणार नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल.

कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरवण्यात येणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. कोणत्याही ग्राहकास सदर अन्नाचे सेवन केल्यामुळे विषबाधा होणार नाही याची दक्षता भोजनालय चालकाने घ्यावी.

प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करून घेऊन त्या प्रशासनाने दिलेले प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावण्याची जबाबदारी भोजनालय चालकाची राहील.

प्रत्येक शिवभोजन केंद्रामध्ये CCTV यंत्रणा बसवणे अनिवार्य राहील. त्याबाबतच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील शिवभोजन केंद्रचालकास द्याव्यात. याबाबतच्या तांत्रिक बाबी विवरणपत्र-अ मध्ये नमूद केल्या आहेत.

संपूर्ण शिवभोजन केंद्राची जागा व्यापेल अशा पद्धतीने CCTV यंत्रणा शिवभोजन केंद्रात बसवण्यात यावी. शिवभोजन केंद्राच्या रचनेनुसार एक किंवा अधिक CCTV कॅमेरा बसवणे आवश्यक राहील, जेणेकरून संपूर्ण शिवभोजन केंद्र दिसू शकेल.

शिवभोजन केंद्राच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता विचारात घेऊन पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com