Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Aadhaar Property Registration : महाराष्ट्रात १ ऑक्टोबरपासून ६३ प्रकारच्या स्थावर मालमत्ता दस्तनोंदणीसाठी आधार ओळख अनिवार्य करण्यात आली आहे. जमीन खरेदी-विक्री, वाटणी, गहाण यासह विविध व्यवहारांसाठी नवा नियम लागू झाला आहे.
Aadhaar Property Registration
Aadhaar Property RegistrationSaam TV
Published On: 

Maharashtra Makes Aadhaar Mandatory : जमिनीच्या खरेदी-विक्रीसह विविध व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता जमिनीची खरेदी-विक्री, वाटणी, बक्षीसपत्र आणि गहाण यांसारख्या तब्बल ६३ प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी 'आधार ओळखपत्र' अनिवार्य करण्यात आले आहे.

बोगस पक्षकार किंवा खोटे साक्षीदार उभे करून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून हा नवा नियम राज्यभरात लागू झाला असून, याबाबतचे अधिकृत राजपत्रही सरकारने जारी केले आहे. आता आधार कार्ड नसल्यास कोणतीही दस्त नोंदणी होणार नाही.

Aadhaar Property Registration
सणासुदीच्या तोंडावर साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, साठेबाजांचे दाबे दणाणले; काढला नवा आदेश

कोणत्याही दस्त नोंदणीसाठी आता आधार ओळखपत्र महसूल विभागाने अनिवार्य करण्यात आले आहे. आधार नसेल तर दस्तनोंदणी होणारच नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मालमत्ता खरेदी विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, एक ऑक्टोंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Aadhaar Property Registration
Bank Scam : महिला सहकारी बँकेत २४२ कोटींचा घोटाळा! संचालकांसह अनेकांवर गुन्हे, ईडीच्या छापेमारीने महाराष्ट्रात खळबळ

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत काम करणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे स्थावर मालमत्तांच्या दस्तनोंदणीची प्रक्रिया पार पाडली जाते. खोटे साक्षीदार, खोटे पक्षकार उभे करून होणारी फसवणूक आता हद्दपार होईल. यामुळे नोंदणी प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी होऊन फसवणुकीचे प्रकार टळतील आणि संपूर्ण कामकाज अधिक कार्यक्षम व पारदर्शक होण्यास मदत होईल. ताटलीत, ज्यांचा आधार क्रमांक नाही त्यांनी आधार नोंदणी केल्याची पावती व त्यासोबत अन्य सरकारी ओळखपत्रे तसेच व्यवहार होत असलेल्या संबंधिताचे नाते सिध्द करणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. पडताळणी झाल्यानंतरच व्यवहार अंतिम होणार आहे.

Aadhaar Property Registration
Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

बालकांसाठी व विशेष घटकांसाठी नियम

१८ वर्षांखालील मुलांच्या बाबतीत त्यांच्या माता-पिता किंवा कायदेशीर पालकांच्या संमतीनेच आधार नोंदणी अर्ज केला जाईल. केवळ आधार क्रमांक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून कोणत्याही बालकाला किंवा पात्र लाभार्थ्याला दस्तनोंदणीच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद या अधिसूचनेत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com