Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! देवीची मूर्ती नेताना पिकअपला ट्रकची धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Amravati Samruddhi Mahamarg Accident Update News : अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या पिकअपला ट्रकची धडक. भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी.
Amravati Samruddhi Highway Accident News
Amravati Samruddhi Highway Accident News Saam Tv
Published On: 

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे निघालेल्या पिकअप वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. धामणगाव रेल्वे परिसरातील चॅनल क्रमांक ९७ जवळ मागून आलेल्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात घटनास्थळी ५ जणांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी २ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा ७ वर पोहोचला आहे. तर तब्बल २५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयासह सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सावंगी येथे १९ जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर धामणगाव येथे सहा जणांवर उपचार सुरू आहेत.

Amravati Samruddhi Highway Accident News
Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील तसेच धामणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, या भीषण अपघाताचा पुढील तपास पोलीस करत असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com