Alisha Khedekar
धूम्रपान करत नसतानाही महिलांना कॅन्सरचा धोका असू शकतो. घरातील प्रदूषण यामागची महत्त्वाची कारणे ठरू शकतात.
लाकूड, शेणाच्या गोवऱ्या किंवा इतर जैवइंधनावर स्वयंपाक करताना निघणारा धूर फुफ्फुसांसाठी त्रासदायक ठरू शकतो.
बायोमास जाळताना सूक्ष्म कण आणि घातक रसायने हवेत मिसळतात. दीर्घकाळ संपर्क आल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
स्वयंपाकघरात योग्य वायुवीजन नसेल तर धूर घरातच साचतो. रोजचा हा संपर्क महिलांसाठी विशेष चिंतेचा विषय आहे.
तेल खूप तापल्यावर स्वयंपाक करताना धूर निर्माण होतो. अशा धुराचा वारंवार संपर्क श्वसनसंस्थेसाठी त्रासदायक ठरू शकतो.
वाहनांचा धूर, धूळ आणि औद्योगिक प्रदूषण यामुळे घराबाहेरील हवा खराब होते. त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा