रायगड: दिवेआगरच्या सुवर्ण गणेश मुखवट्याची पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठा!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे याची पत्रकार परिषदेत दिली आहे.
रायगड: दिवेआगरच्या सुवर्ण गणेश मुखवट्याची पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठा!
रायगड: दिवेआगरच्या सुवर्ण गणेश मुखवट्याची पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठा!राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरमधील चोरी झालेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याची पुन्हा नऊ वर्षाने 23 नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी दिवशी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि त्याच्या पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिवेआगरला या सुवर्ण गणेशमुळे गतवैभव प्राप्त होणार आहे. अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात खासदार सुनील तटकरे Sunil Tatkare यांची पत्रकार आयोजित केली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

हे देखील पहा-

24 मार्च 2012 साली दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातील गणेशाच्या मुखवट्याची चोरी झाली होती. या घटनेत दोन सुरक्षा रक्षकांची हत्या झाली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सर्व पोलीस यंत्रणा तपासाला लावली. पोलिसांनीही आरोपी यांना अटक करून न्यायालयात खटला दाखल केला. यामध्ये आरोपींना शिक्षाही झाली. आरोपीकडून जप्त केले सोने न्यायालयात सादर केले होते. मात्र चोरलेला गणेश मुखवटा चोरट्यानी वितळवला होता. त्यामुळे पुन्हा तसाच सुवर्ण गणेश मुखवटा तयार करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती. निविदे द्वारे प्रसिद्ध सुवर्णकार पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सुवर्ण गणेश मुखवटा बनविण्यात आला असल्याची माहिती खासदार तटकरे यांनी दिली.

रायगड: दिवेआगरच्या सुवर्ण गणेश मुखवट्याची पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठा!
नांदेड हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता?; यात कोणाचा हात?

23 नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुवर्ण गणेश मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशभरातून पर्यटक हे गणेशाच्या दर्शनासाठी मंदिरात येण्यास सुरुवात होईल. सुवर्ण गणेश मुखवटा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुन्हा दिवेआगरला गतवैभव प्राप्त होऊन पर्यटन वाढीसह चालना मिळणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com