

सुप्रीम कोर्टाने सहकार सम्राटांना दिला मोठा धक्का
जिल्हा बँकत १० वर्षे संचालक पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकांना धक्का
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा बँक निवडणुकीचे राजकीय समीकरण
१० वर्षे संचालक पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या १०० पेक्षा जास्त जिल्हा बँकेच्या संचालकांना धक्का बसला आहे. बॅंकिंग सुधारणा कायदा २०२५ नुसार जिल्हा सहकारी बँकांच्या संचालक पदावर १० वर्षेच राहता येणार आहे. आरबीआयने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना बडतर्फी केल्यानंतर उच्च न्यायालयानेही आरबीआयच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.
कोल्हापूर खंडपीठाने सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील २७ सहकार सम्राटांना निवडणूक लढवण्यापासून रोखले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता राज्यातील आजी-माजी आमदार आणि खासदारांना धक्का बसला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एन्ट्री मिळणार नाही. यामध्ये २० पेक्षा अधिक नेत्यांचा समावेश आहे.
मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय झाला होता. या निर्णयामुळे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार विशाल पाटील, माजी खासदार निवेदिता माने, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, भैय्या माने, माजी आमदार राजू आवळे, संतोष पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला. जिल्हा बँक निवडणुकीत सलग १० वर्षे संचालकपद भूषवलेल्या नेत्यांना पुन्हा निवडणुकीसाठी उभं राहता येणार नाही.
जिल्हा बँकांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुका पुढच्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रासह सर्वच मान्यवरांचे लक्ष लागले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर, बँकेतील नेतृत्वाबद्दल, नव्या उमेदवारांना मिळणारी संधी आणि विविध राजकीय गटांची रणनीती यांना महत्व प्राप्त झालं आहे. अनेक आजी-माजी आमदारांना या निवडणुकीत नो एन्ट्री असल्यामुळे आता कोणत्या दिग्गजांना संधी मिळते हे पाहणे महत्वाचे राहिल.
बाबासाहेब पाटील- सहकार मंत्री
हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण मंत्री
दत्ता भरणे - कृषिमंत्री
संजय सावकारे - वस्त्रोद्योग मंत्री
दिलीप वळसे पाटील - माजी मंत्री
प्रवीण दरेकर - भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ संचालक
प्रसाद लाड - आमदार भाजप
सुनील राऊत - आमदार ठाकरे सेना
राजेश विटेकर - आमदार राष्ट्रवादी
विनय कोरे, जन स्वराज पक्ष
एकनाथ खडसे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी
सुरेश देशमुख
रमेश थोरात, नेते राष्ट्रवादी
प्रताप पाटील चिखलीकर, आमदार, राष्ट्रवादी
गुलाबराव देवकर
रामप्रसाद बोर्डीकर, नेते
सुरेश वरपुडकर, माजी मंत्री
अनिल पाटील, माजी मंत्री
उदयनराजे भोसले, खासदार भाजप
विशाल पाटील, अपक्ष खासदार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.