Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

Kolhapur Gokul Milk Union Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलचा विजय झाला. यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला.
Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी
Kolhapur Gokul Milk Union Election Result 2026Saam Tv
Published On: 
  • गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांच्याकडून महायुतीचा पराभव

  • गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलचा विजय

  • गोकुळ निवडणुकीत समविचारी आघाडीला १३ जागा

  • गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीला १२ जागा

कोल्हापुरातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला. सत्ताधारी महायुतीच्या पॅनेलचा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेलचा विजय झाला. गोकुळ दूध संघात २५ संचालकपदांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनेलचे १३ उमेदवार विजयी झाले. तर महायुतीच्या पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महायुतीचा पराभव करत विजय कसा मिळवला? सतेज पाटील यांच्या पॅनेलच्या विजयामागची इनसाईड स्टोरी काय आहे? ते आपण जाणून घेणार आहोत...

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विजयामागची इनसाईड स्टोरी -

- ५ वर्षापूर्वी झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीत सतेज पाटील- हसन मुश्रीम विरुद्ध धनजंय महाडिक असा सामना रंगला होता. त्यावेळी सतेज पाटील- हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाची सत्ता काबीज केली होती.

- मधल्या काळात अजित पवार आणि हसन मुश्रीफ हे महायुतीत गेले. त्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

- दरम्यानच्या कालावधीत कोल्हापूर महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका लागल्या. या सर्व ठिकाणी सतेज पाटील यांना एकटे पाडून महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

- तरीही सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत महापालिकेत ३५ नगरसेवक निवडून आणले.

- दरम्यानच्या कालावधीत गोकुळ निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीआगोदर गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता.

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी
Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

- हसन मुश्रीफ यांना त्यांचे चिरंजव नावेद मुश्रीफ यांना गोकुळचे अध्यक्ष करायचे होते. यावेळी अरुण कुमार डोंगळे यांनी थेट मुंख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. यातूनच भाजपची गोकुळमध्ये एन्ट्री झाली.

- काहीही झाले तरी गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष करायचा या हेतूने व्ह्यूव रचना बांधायला सुरूवात झाली. त्यातून राज्याचे मुऱख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातले.

- तसंच, माहयुतीची बांधणी करून गोकुळ दूध संघात २५ सीट महायुतीच्याच याव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले.

- ज्या संस्थान ऐकत नाहीत आणि अडचणीत आहेत त्यांच्यावर केसेस टाकणे, न्यायालयीन प्रक्रियेत अडकवणे, विरोधकांना अडकवणे अशा कृत्या महायुतीकडून सुरू झाल्या.

- त्यातून दूध उत्पादकांमध्ये रोष निर्माण झाला होता. जेव्हा गोकुळची निवडणूक लागली तेव्हा पुन्हा एकदा एकटं पाडून हा संघ ताब्यात घेण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू झाले.

- यामध्ये प्रामुख्याने मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्यासह कोल्हापुरातील आजी-माजी खासदार, आमदार यांनी सतेज पाटील याच्याविरोधात आपली ताकद पणाला लावली.

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी
Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

- यामध्ये केवळ सत्ता स्थापन करणे हा महायुतीचा हेतू होता तर सतेज पाटील यांनी जाहीर केले की शेतकऱ्यांचे हित म्हणजे गोकुळ. त्यामुळे सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीची स्थापना करून ते गोकुळ निवडणुकीला सामोरे गेले.

- यादरम्यान त्यांनी प्रत्येक ठराव धारकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना विश्वासात घेतलं. तर दुसरीकडे महायुतीने ठराव धारकांना देवदेवतांच्या शपथी घ्यायला लावून भीती घालण्याचा प्रयत्न केला. यातून रोष निर्माण झाला आणि हा रोष दूध उत्पादक ठराव धारकांनी आपल्या मतातून व्यक्त केला.

- गोकुळ दूध संघाच्या निवडणकीत समविचारी आघाडीला १३, महायुतीला १२ जागा मिळाल्या.

- काल दुपारनंतर निकाल जाहीर होत असताना जाणीवपूर्वक निकाल देण्यास विलंब लावला जात होता, असा आरोप सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांनी केला.

- काल मुख्यमंत्री कोल्हापुरात होते. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे का? असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रात्री उशिरा निवडणूक अधिकाऱ्यांनी समविचार आघाडीला १३ जागा मिळाल्याचे जाहीर केले.

- महायुतीला विश्वास होता की, २५ पैकी २५ जागा मिळतील आणि दुपारपर्यंत निकाल लागेल. काल मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा होता. निकाल लागल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोकुळ निवडणुकीत निवडून येणाऱ्या महायुतीच्या संचालकांचा सत्कार करण्याचे नियोजन झाले होते.

- मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांनी निकाल उलटवून लावल्यामुळे महायुतीच्या हाती काहीच उरले नाही. सतेज पाटील यांनी दसऱ्याच्या पूर्व संध्येला गोकुळ दूध संघाच्या सत्तेचे सीमोल्लंघन केले आणि शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या कारभाराचा दूध संघ निर्माण करणार असल्याची घोषणा केली.

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी
Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवारांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com