Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

Gokul Milk Union Election: गोकुळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मोठमोठ्या पैलवानांना मैदानात उतरवलं... तरीही सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना धुळ चारत बंटी पाटलांनी गोकुळमध्ये एकहाती सत्ता कशी मिळवली? गोकुळचा गेम कसा फिरला? कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील कसे यशस्वी ठरलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
GOKUL ELECTION RESULT 2026
GOKUL ELECTION RESULT 2026saam tv
Published On: 

ऐकलंत...सतेज पाटलांच्या अजिंक्यतारा कार्यालयाबाहेरील कार्यकर्त्यांचा जल्लोष खूप काही सांगून जातोय. कार्यकर्त्यांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. कोल्हापुरची आर्थिक वाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हणजे परीवर्तनाची नांदी ठरलीये. महायुती विरुद्ध काँग्रेसचे आमदार सतेज पाटील असा थेट सामना रंगला होता.गोकुळच्या आखाड्यात गेल्या काही दिवसात काय नाही घडलं ते विचारा....संस्था अपात्रता प्रकरण कोर्टात गेलं...गोकुळचा खासगीकरणाचा मुद्दा तापला तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेपाचा आरोप आणि महायुतीत जागावाटपावरुन धुसफूस या सर्व कारणांनी कोल्हापुरचं राजकीय वातावरण अक्षरशा ढवळून निघालं होतं. तर सतेज पाटलांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मजबूत मोट बांधत सत्ताधाऱ्यांचा कंडका पाडला.

सतेज पाटलांचा नादखुळा

महायुती - 12

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी - 13

एकूण जागा - 25

गोकुळ निवडणुकीत गठ्ठा मतदान न होता क्रॉस व्होटिंग झालंय. कोणत्या दिग्गजांचा पराभव झाला ते पाहूया...

नविद मुश्रीफ - गोकुळचे अध्यक्ष

अरुणकुमार डोंगळे - माजी अध्यक्ष

विश्वास पाटील - माजी अध्यक्ष

महायुतीचे चार पैलवान एकीकडे तर सतेज पाटील एकीकडे होते. मात्र बंटी पाटलांनी सगळ्यांना धोबीपछाड दिला. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे 10 आमदार आणि दोन खासदार असतानाही एकहाती कडवी झुंज देत विजय खेचून आणलाय. मागील निवडणूक म्हणजे 2021 मध्ये मुश्रीम आणि सतेज पाटील एकत्र होते. त्यांच्या विरुद्ध भाजपचे धनजंय महाडीक होते.

ईडीचा ससेमिरा मागे लागल्याने मुश्रीफ महायुतीकडे आले. त्यानंतर त्यांनी पुत्र नविद मुश्रीफला अध्यक्ष केले. सतेज पाटलांना सगळ्या निवडणुकीत एकटे पा़डण्याचा प्रयत्न केला. मात्र मनपामध्येही सतेज पाटलांनी ३५ जागा निवडणून आणल्या. आणि आता गोकुळमध्येही तीच स्थिती होती.

चार पैलवानांना केले चितपट -

हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

धनंजय महाडीक - खासदार, भाजप

प्रकाश आबीटकर, आरोग्यमंत्री

VS

सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

4 हजार ठराव आमच्या बाजूने आहेत. आमचाच विजय होणार असा दावा महायुतीचे नेते सतत करत होते. एकतर्फी म्हणजे 25-0 असा निकाल लागेल, असा दावा सत्ताधाऱ्यांचा होता असं असलं तरी सतेज पाटलांच्या विजयाची नेमकी कारणे कोणती पाहूयात....

सतेज पाटलांच्या कुटुंबातील एकही सदस्य मनपा, जि. प., पं. स. गोकुळ मध्ये पदावर नाही

'18 ऑक्टोबर तुम्ही माझ्या बरोबर' ही बंटी पाटलांची टॅगलाईन होती

जिल्हा पिंजून काढत ठरावधारकांना विश्वासात घेतलं

मुळ सभासदांना आपल्या बाजून वळवण्यात यश

सुरुवातीपासूनच महायुतीच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेतल्या

गोकुळचे खासगीकरण, मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप मुद्दा तापला

महायुतीच्या नेत्यांकडून देवीदेवतांची शपथ घालून मतदारांना धाक आणि दम

जेन झी च्या आंदोलनात बदलेलं वातावरणही सतेज पाटलांच्या पथ्यावर पडलं .

मतपेटीत एक चिठ्ठी सापडली होती. तुमच्या पोरा बाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का? अशा शब्दात मतदाराने सत्ताधारी नेत्यांना फटकारले होते. महायुतीच्या नेत्यांनी भावनिक आणि शपथचे धार्मिक राजकारण खेळण्याचा शेवटच्या टप्प्यात प्रयत्न केला. मात्र तो अंगाशी आला. राजकारण न होता गोकुळचं खरच गोकूळ होणार का ? हे पाहणे महत्वाचं आहे. दरम्यान 23 ऑक्टोबर रोजी विधान परीषदेची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यावर या निवडणुकीचा परीणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com