कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

kolhapur politics : राजकारणात कोणत्या क्षणी काय होईल याचा नेम नाही... कार्यकर्त्यांनो डोळे आणि कान उघडून ऐका... ज्यांच्यासाठी तुम्ही आपली डोकी फोडून घेतली.... तेच दोन नेते म्हणजे हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे हे एकत्र आलेत... मात्र कट्टर विरोधक नेते एकत्र येण्यामागचं नेमकं कारण काय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
kolhapur news update
kolhapur newsSaam tv
Published On

लोकसभा असो वा विधानसभा...एकमेकांविरोधात टीकेची एकही संधी न सोडणारे समरजितसिंह घाडगे आणि हसन मुश्रीफांमध्ये मनोमिलन झालंय.. आणि त्याला कारण ठरलीय कागल नगरपंचायत आणि मुरगुड नगरपरिषद..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय..त्यातच आता कोल्हापूरमध्ये नवं समीकरण समोर आलंय.. एकमेकांचं राजकीय करियर उद्ध्वस्त करण्याची भाषा करणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर विरोधक पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाडगे कागल नगरपंचायत निवडणुकीत एकत्र आलेत.

तब्बल 10 वर्षानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलं. नेत्यांसह कार्यकर्त्यांना हूरुप आला. कागल सह मुरगुड नगर परिषद कोणाच्या ताब्यात ? यासाठी राजकारण सुरू झाले. शरद पवार राष्ट्रवादीचे नेते समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवार यांची परवानगी घेऊनच या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना विचारूनच निर्णय घेण्याची परवानगी मिळवली. तर कागल नगरपरिषद आपल्या ताब्यात राहावी यासाठी हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकला... निवडणुकीत अर्ज भरण्याचा दिवस उजाडला... आणि एक अदृश्य शक्ती जागी झाली.

kolhapur news update
Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

या शक्तीने या दोन्ही परस्पर विरोधी विचारसरणीच्या नेत्यांना मुंबई येण्याचा सांगावा धाडला... आणि या अदृश्य शक्तीने झालं गेलं आणि विसरून जावा आणि नांदा सौख्यभराचा आशीर्वादच दिला. या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आपली युती जाहीर करून टाकली... त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप घडला.

कागल आणि मुरगुड नगर परिषदेत अजित पवार राष्ट्रवादी सोबत जाण्याची इच्छा असणाऱ्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार संजय मांडली यांची तळपायाची आग मस्तकाला गेली.... त्यांनी थेट हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांच्यावर तोफ डागली...

kolhapur news update
Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

हसन मुश्रीफ यांच्या सोबत युती करत असताना समरजीत सिंह घाटगे यांनी आपली फसवणूक केल्याची भावना शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी बोलून दाखवली. समरजीत सिंह घाटगे हे मुळात राष्ट्रवादीचे पदाधिकारीच नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ही युती दोन राष्ट्रवादी मधली नसून ही युती हसन मुश्रीफ आणि भाजप मधली असल्याचा आरोप केला.

अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे? आपणाला याचा काय फायदा होणार आहे? हे योग्य वेळी सांगू असं समरजीत सिंह घाटगे यांनी सांगितलं... हसन मुश्रीफ यांनी मात्र सावध पवित्र घेत आपण केवळ कागल तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आल्याचं सांगितलं... कागल तालुक्याला राज्याच्या राजकारणाचं विद्यापीठ म्हटलं जातं... ज्याचा विचार कधीही केला नाही त्या घटना कागलच्या राजकारणात घडत असतात...

kolhapur news update
महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य; नवी मुंबईचाही गौरव, राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

हसन मुश्रीफ आणि छत्रपती शाहू आघाडीची युती कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत झाली... काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा आणि विधान सभेच्या निवडणुकीत एकमेकांत विरोधात प्रचार करताना राजकीय करियर उध्वस्त करू पाहणाऱ्या या दोन नेत्यांनीच आपली शस्त्र अदृश्य शक्तीच्या पायाखाली ठेवल्याने, कागलच्या राजकारणात आता पुढे काय घडतं... याकडे राज्याचं लक्ष लागून राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com