Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

Supreme Court News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यावरून सुप्रीम कोर्टाने इशारा दिला आहे.
Supreme Court
Supreme Court Saam Tv
Published On
Summary

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला ५०% आरक्षण मर्यादा ओलांडल्यास निवडणुका रद्द करण्याचा इशारा

न्यायालयाकडून बांठिया आयोगाच्या २०२२ च्या अहवालानुसारच निवडणुका घेण्याचा संकेत

ओबीसींसाठी २७% आरक्षणाच्या शिफारसीवर पुन्हा चर्चा

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला आदेशाचे उल्लंघन करू नका असे बजावलंय

स्थानिक स्वराज्य स्थंस्थाच्या निवडणुकीदरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू, असा इशारा सुप्रीम कोर्टाचे भावी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिला आहे.

न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षेखाली असलेल्या पीठाने म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ च्या जेके बांठिया आयोगाच्या अहवालाच्या स्थितीनुसार घेतल्या जाऊ शकतात. त्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली होती. या पीठात न्यायाधीश सूर्यकांत यांच्यासहित न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांचाही समावेश होता.

Supreme Court
Beed Politics : बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट; कुठे असेल महायुती कुठे बिघाडी?

अधिवक्ता तुषार मेहता यांच्या विनंतीवरून खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे. राज्य सरकारला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नये असे सांगितले. तुषार मेहता यांनी म्हटलं की, 'निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम दिवस हा सोमवारचा आहे. सुप्रीम कोर्टाने मे महिन्याचा आदेशाचा संदर्भ दिला. त्यात निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.

Supreme Court
Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

न्यायायाधीश बागची म्हणाले,'आम्हाला संकेत दिला होता की, बांठिया प्रकरणाआधी स्थिती कायम राहू शकते. याचा अर्थ असा होतो की, २७ टक्क्यांची सवलत लागू होईल? जर असे असेल, तर निर्देश हे न्यायालयाच्या मागील आदेशाच्या विरुद्ध जातील. त्याचा अर्थ असा होईल की, आदेश दुसऱ्या आदेशाशी विसंगत ठरेल'.

Supreme Court
Mumbai : राज्यात आणखी ५०० कोटींचा घोटाळा; अंजली दमानिया यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com