Beed Politics : बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट; कुठे असेल महायुती कुठे बिघाडी?

Beed Nagarparishad Election 2025: बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट झालं आहे. बीड जिल्ह्यातील ६ नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवारही स्पष्ट झाले आहेत.
Beed News
Beed PoliticalSaam tv
Published On
Summary

बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेतील राजकीय चित्र स्पष्ट

बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी आणि अंबाजोगाई येथे तिरंगी–चौरंगी लढत

अजित पवार गट, शरद पवार गट, भाजप, काँग्रेस, एमआयएम आणि वंचित यांच्यात कडवी चुरस

योगेश काशिद, साम टीव्ही

नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांना अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. यात बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी बघायला मिळाली. यात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बीड नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाकडून डॉ. ज्योती घुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगरध्यक्षपदासाठी प्रेमलता पारवे तर काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी करुणा मस्के, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी स्मिता वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एमआयएमकडून सुरेखा हर्ष शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बीड नगरपरिषद

1) ज्योती घुमरे भाजपा

2) प्रेम लता पारवे राष्ट्रवादी अजित पवार गट

3) करुणा मस्के काँग्रेस

4) स्मिता वाघमारे राष्ट्रवादी शरद पवार गट

5) सुरेखा शृंगारे एम आय एम

गेवराई नगरपरिषद

1) शितल महेश दाभाडे, राष्ट्रवादी अजित पवार गट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

2) गीता बाळराजे पवार भाजप नगरध्यक्ष पदाच्या उमेदवार

3) जबीन जानमोहमंद बागवान, राष्ट्रवादी शरद पवार गट

Beed News
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर दोन बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली

माजलगाव नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार

1) संध्या ज्ञानेश्वर मेंडके- भाजप

2) मेहेरीन बिलाल चाऊस- राष्ट्रवादी शरद पवार गट

3) निरोनिसा खलील आतार पटेल - राष्ट्रवादी अजित पवार गट

4) राधा तुकाराम येवले - शिवसेना (शिंदे गट)

Beed News
Pune : संशयित दहशतवादी हंगरगेकरची कुंडली समोर; पुण्यात १५ वर्ष कुठं काम करत होता? तपासात धक्कादायक माहिती उघड

धारूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार होणार चौरंगी लढत

1) रामचंद्र निर्मळ, भाजप

2) बालासाहेब जाधव,राष्ट्रवादी अजित पवार गट

3) अर्जुन गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गट

4) सुरेश गवळी,शिवसेना शिंदे गट

परळी नगरपरिषदेत दोन्ही मुंडे भावंड एकत्र, तिरंगी होणार लढत

1) संध्या दीपक देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गट

2) सय्यद मैमुना बेगम हनीफ उर्फ बहादूर भाई, काँग्रेस

3) पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी-भाजप शिंदे गट महायुतीच्या उमेदवार

Beed News
Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

अंबाजोगाई नगरपरिषद नगरध्यक्षपदाचे उमेदवार

1) राजकिशोर मोदी नगराध्यक्षपदाचे उमेदवार शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी

2) आसिफ उद्दीन खतीब, काँग्रेस

3) नंदकिशोर मुंदडा, भाजप

4) प्रमोद खंडू मस्के, वंचित बहुजन आघाडी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com