Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Amit Thackeray News : मनसे नेते अमित ठाकरेंवर नवी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैनिकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Amit Thackeray news
Amit ThackeraySaam tv
Published On
Summary

अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैननिकांवर गुन्हा दाखल

नेरुळ पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल

जमावबंदीचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे

विकास मिरगणे, साम टीव्ही

मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैननिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचं उल्लंघन आणि नुकसान केल्याप्रकरणी ठाकरेंसह मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ येथील शिवस्मारकाला रीतसर परवानगी न घेता जमावबंदीचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

Amit Thackeray news
ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली 1,0000000 रुपयांची रोकड; इतकी रक्कम नेमकी कुणाची?

मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. आज नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमासाठी आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी रीतसर परवानगी न घेता या पुतळ्याचे लोकार्पण केले. त्यानंतर नेरूळ पोलिसांनी मनसैनिकांसह अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Amit Thackeray news
Monday Horoscope : जुने मित्र भेटणार, शत्रूंवर मात कराल; ५ राशींच्या लोकांच्या जुन्या गोष्टी नव्याने जुळून येतील

अमित ठाकरेंवरील हा राजकीय कारकिर्दीतील पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होणार असल्याची कल्पना अमित ठाकरेंना होती. त्यावर भाष्य करताना त्यांनी म्हटलं होतं की, या कार्यासाठी झालेला हा माझ्यावरील पहिला गुन्हा असेल आणि त्याचा मला आनंदच असेल'.

अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं की, महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत... महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन केला जाणार नाही. आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो होतो. त्यावेळी समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फक्त लोकार्पणासाठी नेता मिळत नसल्याने घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवलाय. या चार महिन्यांत विमानतळासाठी, दहीहंडी, दिवाळी, दसरा…सगळ्या कार्यक्रमांना नेते पोहोचल्याचे दिसले'.

Amit Thackeray news
Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

'स्वराज्याचे संस्थापक, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करायला त्यांना एक तासही मिळाला नाही का? निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून महाराजांच्या नावावर टाळ्या घेणाऱ्यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही?हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे' ,अशी टीका त्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com