ahilyangar news update
ahilyangar newsSaam tv

ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली 1,0000000 रुपयांची रोकड; इतकी रक्कम नेमकी कुणाची?

ahilyangar news : ऐन निवडणुकीत नगरमध्ये कारमध्ये 10,000,00 रुपयांची रोकड सापडली. ही रक्कम कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Published on
Summary

संगमनेरमध्ये वाहनात सापडले एक कोटी रुपये

निवडणूक आयोगाच्या पथकाने जप्त केली रोकड

हिंगोलीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच लाखांची रोकड जळाली

सचिन बनसोडे, साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये वाहनात एक कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. पोलिसांनी ही रोकड हस्तगत केली आहे.

संगमनेर शहरात एका वाहनात एक कोटी रुपयांची रोकड सापडल्याची माहिती मिळत आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाच्या पथकाने ही मोठी रक्कम हस्तगत केली. ही रक्कम नेमकी कुणाची आणि कशासाठी वापरली जाणार होती, याबाबत तपास सुरू आहे.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहर हद्दीत येणाऱ्या वाहनांवर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे.

ahilyangar news update
Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

हिंगोलीत आग लागून पाच लाखांची रोकड जळाली

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील काठोडा तांडा गावात घराला आग लागून घरातील पाच लाख रुपयांची रोकड जळून खाक झाल्याची घटना घडली. वसंत राठोड असे घराला आग लागून नुकसान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ahilyangar news update
India vs South Africa Test Match : टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर

या घटनेत कुणालाही इजा झाली नसली तरी राठोड कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालं आहे. या आगीमध्ये घरातील धान्य, कपडे, संसार उपयोगी साहित्य आणि राठोड कुटुंबाने कष्ट करून जमा केलेली पुंजी जळून खाक झाली आहे. या घटनेनंतर राठोड कुटुंबाने वीज वितरण कार्यालयाला नुकसान भरपाई करून देण्याची मागणी केली आहे.

Q

नगरमध्ये पैसे कुठे आणि कधी सापडले?

A

संगमनेर शहराच्या प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाच्या तपासणीदरम्यान वाहनातून एक कोटी रुपये सापडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com