India vs South Africa Test Match : टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर

shubman gill injured : टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसलाय. स्टार खेळाडू संघाच्या बाहेर गेला आहे.
shubman gill
shubman gill injuredSaam tv
Published On
Summary

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत कर्णधार शुभमन गिल मान आखडल्याने रिटायर्ड हर्ट

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथक गिलवर लक्ष

शुभमन गिल फक्त त्या दिवशीच नाही तर पुढच्या दिवशीही फलंदाजीसाठी उतरू शकणार नाही अशी माहिती मिळतेय

त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतकडे संघाचे नेतृत्व

दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी सामनादरम्यान टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिलची स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नात मान आखडली. त्यांच्या मानेला दुखापत झाल्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी उतरू शकला नाही. या दुखापतीमुळे पुन्हा संघासाठी मैदानात उतरणार का, यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

बीसीसीआयने सांगितलं की, 'शुभमन गिलची मान आखडली आहे. बीबीआयचं वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर मैदानात खेळण्यासाठी उतरवणार आहे.

shubman gill
MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

गिलने मैदानात फक्त तीन चेंडूवर फलंदाजी केली. त्यानंतर त्याला मैदानातून बाहेर पडावं लागलं. दुखापत झाल्यानंतर फिजियो तातडीने मैदानात आले. पण तरीही स्टार खेळाडूला तंबूत परतावं लागलं. सामन्यातील ३५ व्या षटकात शुभमनच्या मानेला दुखापत झाली. दुखापतग्रस्त झालेला शुभमन पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. या सामन्यात भारताने ९ गडी गमावून १८९ धावांवर खेळ थांबवला. पहिल्या डावात भारताने ३० धावांची आघाडी घेतली आहे.

shubman gill
DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

गिल फक्त आजच फलंदाजी उतरणार नाही. तर दुसऱ्या दिवशी देखील फलंदाजी करण्यासाठी उतरणार नसल्याची माहिती हाती आली आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाची कमान सांभाळत आहे. या सामन्यादरम्यान पंत हा कोच गौतम गंभीर यांच्यासोबत बोलताना दिसला. पंत पहिल्यांदा कसोटी सामन्यात संघाचं नेतृत्व करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com