MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

MP Shrikant Shinde News : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज असल्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
Shrikant Shinde News
Shrikant ShindeSaam tv
Published On
Summary

दहशतवादी पथकाची मुंब्रा येथे धाड

डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुंब्रा प्रकरणात मोठी प्रतिक्रिया

बदलापुरात शिवसेनेच्या मेळाव्यानंतर श्रीकांत शिंदे बोलत होते

दिल्ली बॉम्बस्फोटाचं मुंब्रा कनेक्शन समोर आल्यानंतर ATSनं मुंब्र्यात सर्च ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलीय. बदलापुरात शिवसेनेच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुंब्रा कनेक्शनवर वक्तव्य केलं. तपासानंतर स्फोटाचे धागेदोरे समोर येतील असंही खा. शिंदे यांनी म्हटलंय.

दिल्ली स्फोटानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाचं धाडसत्र सुरु झाली आहे. एटीएसने शिक्षक इब्राहिम आबिदी यांच्या मुंब्रा आणि कुर्ला या दोन्ही भागातील घरावर धाड टाकली.

Shrikant Shinde News
Mumbai Shocking : मुंबईची पहिली भेट अखेरची ठरली; उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

या धाडीत घरातून मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त केलं. तर पुण्यातील जुबैर हंगरगेकर यांच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुंब्रा भागात एटीएसने सर्च ऑपरेशन करण्याची इच्छा खासदार शिंदेंनी व्यक्त केली.

अंबरनाथ-बदलापुरात महायुतीवर अद्यापही प्रश्नचिन्ह

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे युती करताना कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची आहे अशी सावध प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलीय. अंबरनाथ-बदलापुरात शिवसेना-भाजप युती होणार की नाही यावरून वरिष्ठ पातळीवर खलबतं सुरू आहेत. स्थानिक पातळीवर मात्र युती होऊ नये अशीच दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

Shrikant Shinde News
Mumbai Fire : मुंबईत दोन ठिकाणी आगीच्या घटना; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

2014 नंतर तब्बल 10 वर्षांनी निवडणूक होत असल्यानं सगळेच जण नगरसेवकपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. मात्र युतीचा निर्णय होत नसल्यानं दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत युतीचा निर्णय न झाल्यास दोन्ही शहरांमध्ये शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढणार असंच चित्र सध्यातरी पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com