Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर दोन बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली

Sharad Pawar News : निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या दोन नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.
Sharad pawar news update
Sharad pawar Saam tv
Published On
Summary

इंदापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का

भरत शहा यांचा अजित पवार गटात प्रवेश

पालघरमध्येही शरद पवारांना मोठा धक्का, चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुण्यातील इंदापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटातील भरत शहा यांनी हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. शहा यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला. दुसरीकडे पालघरमधील शरद पवार गटाचे नेते काशिनाथ चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार गटाने भरत शहा यांना इंदापूर नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. भरत शहा यांच्या उमेदवारीला अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी विरोध दर्शवला होता. या विरोधाला झुगारून भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये भरत शहा आणि प्रदीप गारटकर यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी आमने-सामने लढाई पाहायला मिळणार आहे.

Sharad pawar news update
Bihar Tragedy : क्षणात होत्याचं नव्हतं; घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

पालघरमध्येही शरद पवारांना मोठा धक्का

पालघरच्या गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून भाजपने आरोप केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. डहाणू येथे खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत चौधरी यांनी शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. काशिनाथ चौधरी यांच्यासोबत ३ हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला . गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात काशिनाथ चौधरी हेच मुख्य आरोपी असल्याचा आरोप भाजपने केला होता.

Sharad pawar news update
Bihar Election : बिहारमध्ये राष्ट्रवादीची उडाली धुळधाण; अजित पवारांच्या पक्षाला नोटापेक्षा कमी मतं, VIDEO

भंडारा जिल्ह्यात अजित पवार गटात नाराजीचा सूर

भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात 'हाय व्होल्टेज' नगरपरिषद म्हणून ओळख असलेल्या भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीने मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. भाजपने विद्यमान नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना पुन्हा एकदा संधी देऊन आपले पत्ते स्पष्ट केले आहेत. मात्र, खरी खळबळ उडाली आहे ती राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने पुन्हा एकदा अभिषेक कारेमोरे यांच्यावरच नगराध्यक्षपदासाठी विश्वास दाखवला आहे. मात्र, पक्षाच्या या निर्णयामुळे निष्ठावान युवा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Sharad pawar news update
मुंबईत चाललंय काय? किल्ल्यावर चक्क दारूची पार्टी; परवानगी मिळाली कशी? ठाकरे गटाचा सवाल, VIDEO

नगराध्यक्षपदाकरिता राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ता सागर गभणे आणि यासीन छवारे यांनी देखील उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या आणि नगराध्यक्षपदासाठी पात्र असलेल्या इतर उमेदवारांकडे दुर्लक्ष करून पुन्हा त्याच व्यक्तीला संधी देण्यात आली. हा निर्णय म्हणजे 'कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर अन्याय असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com