Bihar Election : बिहारमध्ये राष्ट्रवादीची उडाली धुळधाण; अजित पवारांच्या पक्षाला नोटापेक्षा कमी मतं, VIDEO

Bihar Election Result : बिहारमध्ये महागठबंधन आणि तेजप्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाची मोठी पिछेहाट झाली.. मात्र त्यापेक्षा धुळधाण उडाली ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची...अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बिहारमध्ये किती जागांवर उमेदवार दिले होते आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना किती मतं मिळाले? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Maharashtra Politics
Ajit Pawar Saam tv
Published On

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दणदणीत विजय मिळवला.. मात्र महाराष्ट्रात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुरती धुळधाण उडालीय... उमेदवारांचं अक्षरशः डिपॉझिटही जप्त झालंय..या दारुण पराभवावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देतांना आपला विरोध असतानाही प्रफुल्ल पटेलांनी उमेदवारी उभे केल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय..

खरंतर अजित पवारांची राष्ट्रवादी एनडीएचा घटकपक्ष आहे. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीने बिहारमध्ये एकला चलोचा नारा देत 16 उमेदवार दिले. या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय.. एवढंच नाही तर अनेक उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाले आहेत. 16 पैकी 11 उमेदवारांना 200 पेक्षा कमी मतं आहेत.. ही मतं नोटापेक्षाही कमी आहेत.. तर इतर उमेदवारही 1000 पेक्षा जास्त मतं मिळवू शकले नाहीत

Maharashtra Politics
Shocking : रक्तरंजित थरार! मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजप नेत्याची निर्घृण हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

खरंतर सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आल्यानंतर अजित पवारांनी प्रफुल्ल पटेलांकडे बोट दाखवलंय.. त्यामुळे अजित पवारांचं पक्ष नेमकं कोण चालवतं? असा प्रश्न निर्माण झालाय... त्याला फक्त बिहारची निवडणूक हे एकच कारण नाही... तर याआधीही अशाच प्रकारे अजित पवारांना कल्पनाही न देता पक्षात निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं... मात्र हे निर्णय कोणते होते? पाहूयात..

Maharashtra Politics
Bihar : आई आणि कुटुंबातील सदस्यांचीही मते मिळाली नाहीत; पराभूत उमेदवाराने फोडलं EVMवर खापर

छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याला अजित पवारांचा विरोध होता.. त्यानंतरही प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांना मंत्रिपद दिल्याची चर्चा आहे... एवढंच नाही तर धाराशिवमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी केलेल्या सुरज चव्हाण यांना तटकरेंनी सरचिटणीसपदी बढती दिली... हा निर्णयही अजित पवारांच्या परस्पर घेण्यात आला होता..याच निर्णयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याचा दावा केला होता.

Maharashtra Politics
Bihar Politics : बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघे पक्षातून निलंबित

अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.. मात्र त्यांच्या परस्पर पक्षातील नियुक्त्या, मंत्रिपद देण्याच्या घटनाच नाही तर थेट निवडणूक लढवण्याचा धोरणात्मक निर्णयही घेतला जातोय... त्यामुळे या घटनांमुळे अजित पवारांचा पक्षावर नेमकं निंयंत्रण कुणाचं? असा प्रश्न निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com