Bihar Politics : बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघे पक्षातून निलंबित

Bihar Political News : बिहारच्या विजयानंतर भाजपने मोठी कारवाई केली आहे. आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघांना पक्षातून निलंबित केलं आहे.
Bihar Politics
Bihar Saam tv
Published On
Summary

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत

विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर भाजपकडून तीन नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई

माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी नितीश कुमार आणि सम्राट चौधरी यांच्यावर केली होती टीका

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं आहे. मात्र, विजयाच्या दुसऱ्या दिवशीच भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने बिहारचे माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तीन नेत्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित केलं आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह हे नुकतेच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. एका भाषणात आर के सिंह यांनी जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी नितीश कुमार सरकारवर ६२ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

Bihar Politics
Mumbra Crime : दहशतवादी विरोधी पथकाची महाराष्ट्रातील मुंब्र्यात धाड; शिक्षकाला घेतलं ताब्यात

बिहारमधील भाजप नेते सम्राट चौधरी यांना 'खुनी' म्हटलं होतं. आर के सिंह यांच्या विधानाने भाजपसहित जनता दल युनायटेड पक्षाची प्रतिमा डागाळली होती. यानंतर भाजपने ही कारवाई केली आहे. आर के सिंह यांनी २०१३ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Bihar Politics
Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने भाजपहून अधिक जागा जिंकल्या होत्या. यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांना भाजपचा मोठा भाऊ बोलण्यात येत होतं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण समीकरण बदलून गेलं आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये प्रत्येकी १०१-१०१ जागांचं वाटप झालं होतं. यंदा भाजपने ८९ तर जनता दल युनायटेडने ८५ जागा जिंकल्या आहेत. तत्पूर्वी, माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह यांच्यासहित आमदार अशोक अग्रवाल आणि उषा अग्रवाल या नेत्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com