मुंबईत चाललंय काय? किल्ल्यावर चक्क दारूची पार्टी; परवानगी मिळाली कशी? ठाकरे गटाचा सवाल, VIDEO

Bandra Fort Liquor Party video viral : मुंबईतील वांद्रे येथील किल्ल्यावर दारुची पार्टीची झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Mumbai heritage site
Bandra FortSaam tv
Published On
Summary

वांद्रे किल्ल्यावर खासगी दारू पार्टी

महाराष्ट्र सरकार आणि पर्यटन विभाग यांची परवानगी असल्याचा आरोप

अखिलेश चित्रे यांची महायुती सरकारवर टीका

सोशल मीडियावर ऐतिहासिक स्थळावर अशा प्रकारच्या कार्यक्रमाविरोधात रोष व्यक्त

मुंबईतील एका किल्ल्यावर धक्कादायक प्रकार घडला आहे. वांद्रे येथील किल्ल्यावर दारूची पार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याने चहू बाजूंनी टीका होत आहे. ठाकरे गटाचे अखिलेश चित्रे यांनी या प्रकारावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

अखिलेश चित्रे यांनी पोस्ट करत महायुती सरकारला अनेक सवाल केले आहेत. चित्रे यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या त्यानंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पालिका परवानगी देतंच कसं?'

Mumbai heritage site
ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा हादरा; विश्वासू नेत्यानं साथ सोडली, तडकाफडकी राजीनामा

'किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर 'महाराष्ट्र पर्यटन' विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called 'सांस्कृतिक मंत्री' आशिष कुरेशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Mumbai heritage site
Maharashtra Politics : धनंजय मुंडे स्टार प्रचारक, राष्ट्रवादीत वाद; सोळंकेंची मुंडेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

'सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही, तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे... हेच भाजप आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती, अशी सणसणी टीका देखील चित्रे यांनी केली.

Mumbai heritage site
प्रकाश आंबेडकर–काँग्रेसची हातमिळवणी; राज्यातील आणखी एका जिल्ह्यात युतीचा नवा प्रयोग, वंचितला किती जागा मिळाल्या?

चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्टसहित व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. चित्रे यांच्या पोस्टवर अनेकांनी सरकारला प्रश्न उपस्थित होते. ऐतिहासिक वास्तूवर खासगी पार्टी कशी होऊ शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्याच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकार काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com