प्रकाश आंबेडकर–काँग्रेसची हातमिळवणी; राज्यातील आणखी एका जिल्ह्यात युतीचा नवा प्रयोग, वंचितला किती जागा मिळाल्या?

Buldhana politics : प्रकाश आंबेडकर–काँग्रेसने आणखी एका जिल्ह्यात हातमिळवणी केली आहे. दोन्ही पक्षाने ५०-५- तत्वावर जागा वाटप केलं आहे.
Buldhana News
Buldhana politics : Saam tv
Published On
Summary

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ५०-५० जागावाटपासह युती

बुलढाणा जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये निवडणुका

वंचित आघाडीने उमेदवार आणि प्रचार आराखडा पूर्ण केल्याचा दावा

वंचित आणि काँग्रेसची युती जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता

बुलढाणा जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसशी युती जाहीर झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० टक्के जागावाटप निश्चित झाले आहेत. या आधारे नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

दोन्ही पक्षाच्या जागावाटपानुसार वंचित बहुजन आघाडी बुलढाणा घाटावरील बुलढाणा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि लोणार तसेच घाटाखालील खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोद या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढवणार आहे.

Buldhana News
Bihar : आई आणि कुटुंबातील सदस्यांचीही मते मिळाली नाहीत; पराभूत उमेदवाराने फोडलं EVMवर खापर
Buldhana News
Maharashtra Politics : धनंजय मुंडे स्टार प्रचारक, राष्ट्रवादीत वाद; सोळंकेंची मुंडेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व उमेदवार, संघटनात्मक तयारी, प्रचार आराखडा आणि कार्यकर्त्यांचे नियोजन पूर्ण केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे यांनी सांगितले.

Buldhana News
DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

या युतीमुळे जिल्ह्यात मजबूत पर्याय उभा राहील आणि दोन्ही पक्षांना चांगले यश मिळेल, असा विश्वासही वानखेडे यांनी व्यक्त केला. 'वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ही युती जिल्ह्यात चांगले यश संपादन करेल, याची मला पूर्ण खात्री आहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक राजकारणात ही युती मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये या आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Buldhana News
ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा हादरा; विश्वासू नेत्यानं साथ सोडली, तडकाफडकी राजीनामा

नांदेडमध्येही काँग्रेस-वंचितचा हातात हात

नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी १३ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा करण्यात आली. काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत 50-50 या तत्त्वावर जागावाटप निश्चित केल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com