Maharashtra Politics : धनंजय मुंडे स्टार प्रचारक, राष्ट्रवादीत वाद; सोळंकेंची मुंडेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

Ajit Pawar group news : धनंजय मुंडेंचं स्टार प्रचारकपद वादात सापडलंय.. तर स्टार प्रचारकपदाचा वाद पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात पोहोचलाय... मात्र हा वाद नेमका काय आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Maharashtra Politics
Ajit Pawar group news Saam tv
Published On

धनंजय मुंडेंमागची वादांची मालिका संपायला तयारी नाही....आता राष्ट्रवादीतच त्यांच्या स्टार प्रचारकपदाचा वाद पेटलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्टार प्रचारकपदाची जबाबदारी दिली.. मात्र आता स्टार प्रचारकपदावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडलीय....मुंडे विरोधकांसोबत बैठका घेत असल्याचा आरोप करत त्यांच्या पक्षातील आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केलीय.

Maharashtra Politics
Byculla Incident : मुंबईत इमारत बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना; दोन कामगारांचा मृत्यू

खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं...त्यानंतर मुंडे विजनवासात गेले होते.. मात्र आता धनंजय मुंडेंची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आणि सर्वात आधी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी या पदावरून त्यांना लक्ष्य केलं.

Maharashtra Politics
Shocking : निष्ठूर शिक्षिका, अघोरी शिक्षा; 100 उठाबशा बेतल्या चिमुकलीच्या जीवावर, VIDEO

धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुंडे वादाच्या भोवऱ्यात आहेत.. आधी करुणा मुंडेंच्या प्रकरणात कोर्टानं दिलेला विरोधातला निर्णय़...त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गेलेलं मंत्रिपद..एवढंच नव्हे तर कृषी घोटाळा आणि जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप... यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आहेत... त्यातच आता धनंजय मुंडेंची पक्षातूनच तक्रार केल्यानं मुंडेंचं स्टार प्रचारकपद तरी राहणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com