Mumbai : राज्यात आणखी ५०० कोटींचा घोटाळा; अंजली दमानिया यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

BMC hospital controversy : मुंबईतील ५०० कोटींचं पालिकेचं हॉस्पिटल वादात सापडलं आहे. या विरोधात अंजली दमानिया यांनीही कठोर भूमिका घेतली आहे.
kanpur news
hospital Saam tv
Published On
Summary

महापालिकेने उभारलेले गोवंडीतील नवीन मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल वादात सापडलंय

अंजली दमानिया यांनी हॉस्पिटल खासगी हातात देण्याचा आरोप केलाय

गरीबांसाठी फक्त 264 खाटा आणि बाकी खाटा खासगी रुग्णांसाठी वापरण्याचा आरोप करण्यात आला आहे.

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या गोवंडी परिसरात बीएमसीने तब्बल 500 कोटी खर्चून उभारलेले नवीन 580-बेडेड मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. हे सार्वजनिक निधीतून उभारलेले रुग्णालय पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलवर खासगी हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, 'जमीन लोकांची, पैसा लोकांचा, रुग्णालयही लोकांसाठी आहे. मग ते राजकारण्यांच्या किंवा खासगी रुग्णालयांच्या घशात का घालायचं? जनतेसाठी असलेली सर्व सेवा विक्रीला काढण्याचा प्रकार सहन होणार नाही. 580 खाटांपैकी फक्त 264 खाटा गरीब आणि अंडी हे केसरी शिक्षापत्रिकाधारकांसाठी ठेवले जातील. तर बाकीच्या खाटा खासगी रुग्णांसाठी वापरले जाऊन हॉस्पिटलचा व्यावसायिक वापर सुरू होईल'.

kanpur news
Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

'स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्था या निर्णयाविरोधात संघर्ष पुकारत आहोत. बीएमसी जनतेचा पैसा वापरून तयार केलेल्या सार्वजनिक सुविधा खासगीकरणाच्या दिशेने ढकण्यात येत आहेत, असा आरोप दमानिया यांनी केला.

kanpur news
अपहरण करून तरुणाला गुजरातला नेलं; लैगिंक अत्याचारानंतर जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया, मुंबईतील ट्रान्सजेंडर टोळीचा कारनामा

दमानिया यांनी पुढे स्पष्ट केले की, आपण शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा मजबूत करण्यासाठी कर देतो. बीएमसीला हे करायचंच नसेल तर मग लोकशाहीचा उपयोग काय? आम्ही हा निर्णय हाणून पाडण्यासाठी लढणार, असे त्या पुढे म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर अद्याप मुंबई महापालिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com